कैलासराजे घरत पेण प्रतिनिधी: पेण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये वॉर्ड क्रमांक 9 रामवाडी, समर्थ नगर, सुतारवाडी, आनंदनगर, शिवाजीनगर, रेल्वे कॉलनी, एसटी कॉलनीचे शिवसेना ( शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक विश्वास पाटील सर यांना स्वतः मतदार भेटण्यासाठी येत आहेत... आम्हाला विकासासाठी परिवर्तन पाहिजे आहे... तुमच्याकडून आमच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे... त्यावेळी पाटील सर म्हणाले फक्त पाच वर्षाची संधी द्या, या पूर्ण वॉर्डचा कायापालट करण्याचं माझं स्वप्न आहे... रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, नगरपालिकेच्या माध्यमातून फिरता दवाखाना, बेरोजगारांना व्यवसायाच्या माध्यमातून उभे करणार... महिन्याच्या प्रत्येक रविवारी विभागप्रमाणे समस्या निवारण सभा हे माझे स्वप्न आहे... कोणतीही सत्ता हातात नसताना अनेक माझ्या माता भगिनींना लाडक्या बहिणीचा लाभ मिळवून दिला... वयोवृद्ध व विधवा महिलांना संजय निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला... व्यवसायासाठी तरुणांना बँकेच्या माध्यमातून मदत केली... या कार्याची पावती माझे मतदार मला निश्चितच देतील अशी माझी खात्री आहे... मी उच्च पदवीधर आहे... एका मोठ्या संस्थेचा मुख्याध्यापकम्हणून पदभार सांभाळत असलो तरी तुमच्यापेक्षा मोठा नाही... तुम्हीच माझे दैवत आहात... विरोधकांना पंधरा वर्षे जे करता आले नाही, ते मी पाच वर्षात करेन अशी मला खात्री आहे... कोणत्याही खोट्या आमिशाला बळी न पडता... धनुष्यबाणा समोरचा बटन दाबून बहुमताने विजयी करा हीच अपेक्षा... असे भावपूर्ण उद्गार विश्वास सर याने आपल्या घरगुती छोटेखाणी सभेत काढले...
