मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील)
आपल्या शेठजींच्या फायद्यासाठी मुंबईच्या भूमिपुत्रांच्या हक्कांवर बुलडोझर!
गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत. मात्र आपल्या बिल्डर आणि उद्योगपती मित्रांचे हित साधण्यासाठी हे कपटी सरकार भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचा कारस्थान वारंवार रचत आहे...
धारावी कोळीवाडाच्या अदानीच्या धारावी विनाश प्रकल्पात समाविष्ट नाही, तरी कोळीवाड्याची बाह्य सीमा चुकीची दाखवून तिथे अदानीच्या लोकांकडून सर्वेक्षण केले जात आहे, आणि भूमिपुत्रांच्या जमिनी हडपण्याचा कट रचला जात आहे...
या विरोधात धारावीच्या जनतेने आक्रोश व्यक्त केला. धारावी कोळी जमात ट्रस्टच्या या आक्रोश मोर्च्यात सहभागी होऊन अदानी सरकारच्या या राक्षसी वृत्तीला काळे झेंडे दाखवून विरोध केला...
आमची मागणी आहे की आधी धारावी कोळीवाड्याचे बाह्य सिमांकन व विस्तारीत जमीन निश्चित करावी, तो पर्यंत DRPचा कोणताही सर्वे किंवा काम येथे करू नये...
ही लूट धारावी कोळीवाडापूर्ती मर्यादित नाही... काही महिन्यांपूर्वी कुर्ला येथील ख्रिश्चन व्हिलेज आणि वांद्रे येथील चिंबई गावठाणांना स्लम गोषित करून सर्वेक्षण करण्यासाठी नोटीस दिल्या गेल्या, पण दक्ष नागरिकांनी आणि आम्ही आवाज उचलल्यावर हे सर्वेक्षण थांबवण्यात आले...
मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट GR असूनही गावठाणे आणि कोळीवाडे यांना स्लम दाखवून, भूमिपुत्रांच्या जमिनी लाटण्याचे पाप अदानी सरकार करत आहे...
मुंबईच्या भूमिपुत्रांना झोपडपट्टीवासी कसे म्हणता येईल?
मुंबईतील सर्व गावठाण आणि कोळीवाड्यांचे बाह्य सीमांकन निश्चित करून त्यांची मॅपिंग मुंबईच्या विकास आराखड्यात करण्यासाठी आम्ही सातत्याने लढत आलो आहे... भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठीचा आमचा हा लढा असाच सुरू राहील...
हे सरकार जनतेसाठी नव्हे, तर काही विशिष्ट उद्योजक मित्रांसाठी काम करत आहे, हे मुंबईचे आणि महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे...
