प्रति खंडी ४३०० रुपये दर पार
सभापती किरपान यांचे उत्तम नियोजन
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक:- कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या मुख्य बाजार आवारात रविवार (दि.१६) नोव्हेंबर पासुन धान्यमालाची खरेदी-विक्रीचा शुभारंभ झाला. धान (भात) खरेदी-विक्री हंगामाला शेतकऱ्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सभापती सचिन किरपान यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजन आणि व्यवहारातील पारदर्शकतेमुळे धान्याच्या दराने प्रतिखंडी ४३०० इतका उच्चांक गाठला आहे. सभापती सचिन किरपान यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरवातीलाच आवाहन केले होते की, 'योग्य भाव अचूक वजन आणि फसवणूक टाळण्यासाठी त्यांची आपल्या धान इतरत्र न विकता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात' या आवाहनाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे. शुभारंभाच्या केवळ ८ दिवसांतच बाजार समितीच्या आवारात आवारात तब्बल २५ हजार क्विंटल धानाची आवक झालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या नजर टाकली असता एक मोठा परीसर धानाच्या पोत्यांच्या थप्प्यांनी व्यापलेला आहे. येथे हल्ली धान्य साठवणुकीसाठी भले मोठ मोठे शेड उभारल्या गेले आहे. त्याचप्रमाणे बाजार आवारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात धान खरेदीसाठी आलेल्या आडते आणि व्यापाऱ्यांमुळे धानाचे दर वाढले आहेत. दरांमध्ये झालेल्या चढाओढीमुळे धानाला प्रति खंडी (१५० किलो) ४३०० रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळाला आहे. सभापती सचिन किरपान यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीने आवारात पिण्याचे पाणी, शेतमाल उतरवण्यासाठी पुरेशी जागा, योग्य वजनमाप आणि जलद चुकाऱ्याची व्यवस्था केल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. बाजार समितीचे हे नियोजन शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणारे ठरले आहे. ज्यामुळे येत्या काळात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाजार समितीने केलेल्या या यशामुळे रामटेक परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला मोठी चालना मिळाली असून, यंदाचा धान हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिक समृद्धीचा ठरणार असल्याची चिन्हे दिसु लागली आहेत...
सभापतींचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
शेतकरी हिताच्या बाबींमध्ये सभापती किरपान हे नेहमी अंग्रेसर असतात. शेतकऱ्यांची फसवणुक होवु नये यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की शेतकऱ्यांनी अवैध व्यापाऱ्यांकडून माल खरेदी विक्री करण्यापासुन सावध राहावे, गावात गाडी लावुन शेतकऱ्यांपासुन माल खरेदी करणारे खाजगी व्यापारी पैसे किंवा मोबदला वेळेवर देतीलच व देतीलच याची शाश्वती नाही, मग चुकाऱ्यासाठी आपली कामे सोडुन अशा व्यापाऱ्यांच्या मागे फिरण्यात काही अर्थ नाही असे सांगत असा प्रकार बाजार समितीमध्ये होत नसुन असे उदाहरण सुद्धा माझ्या कारकिर्दीत नसल्याचा विश्वास सभापती सचिन किरपान यांनी देत आपला माल बाजार समितीमध्येच आणावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे.
