महाराष्ट्र वेदभुमी

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत)तर्फे एक दिवसीय "राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळा-२०२५"

 

रायगड प्रतिनिधी  (कैलासराजे घरत) : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत) तर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय पत्रकार-कार्यशाळा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शनिवार दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी हॉटेल मेट्रो पॅलेस फॅमिली रिसॉर्ट व रेस्टॉरंट, वावंढल, चौक फाटा, जुना मुंबई–पुणे महामार्ग, ता. खालापूर, जि.रायगड येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ(भारत)राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय महासचिव विनोद पवार,राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल, राष्ट्रीय सल्लागार डॉ.सुरेंद्र शिंदे, राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे आदी प्रमुख मान्यवर तसेच संपूर्ण राज्य कार्यकारिणी व सर्व समिती प्रमुख यांची उपस्थिती लाभणार आहे...

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कांतीलाल कडू-मुख्य संपादक, दैनिक निर्भीड लेख, प्रा.सुशील जाधव-स्तंभलेखक, पत्रकार, विद्यार्थी मार्गदर्शक, निलेश ठाकरे-इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र आणि नरेंद्र सोनारकर-संपादकीय व साहित्यिक मार्गदर्शन यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे... याचबरोबर केंद्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत... या कार्यशाळेत खालील प्रमुख विषयांवर मार्गदर्शन होणार आहे... कार्यशाळेची विषयरचना: पत्रकारितेतील नवतंत्रज्ञान, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यामध्ये प्रमुख सत्रे :

1)प्रिंट मीडिया–बातमी लेखन व संपादकीय दृष्टिकोन

2)इलेक्ट्रॉनिक मीडिया–सादरीकरण कौशल्य व तथ्य पडताळणी

3)डिजिटल मीडिया–आचारसंहिता, डिजिटल सुरक्षा व नवमाध्यम

कार्यक्रमाची रूपरेषा

शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ -राज्यस्तरीय कार्यशाळा: दुपारी १२:३० वाजता–कार्यशाळेला सुरुवात होईल सुरुवातीस महापुरुषांचे पूजन नंतर संविधान उद्देशिका वाचन, उपस्थित मान्यवरांचा स्वागत-सत्कार समारंभ होईल... दुपारी १२:३० ते १ वाजेपर्यंत  जिल्हानिहाय परिचय व सन्मान करण्यात येईल... नंतर दुपारी १:०० ते २:०० भोजन व्यवस्था तदनंतर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत मुख्य कार्यशाळा सत्र आयोजित करण्यात आले आहे...

दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी “एक दिवस स्वतःसाठी” प्रेरणादायी, मोटिवेशनल व स्वतःसाठीचा आत्मचिंतन उपक्रम आयोजित केला आहे. आपल्या उपस्थितीने हा कार्यक्रम अतिशय अविस्मरणीय ठरेल यात शंकाच नाही. तरी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ(भारत)च्या सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि विविध संलग्न समित्यांमधील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक रायगड-ठाणे-मुंबई विभाग यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post