महाराष्ट्र वेदभुमी

शेतकरी संघटना व संघटनेचे ४ ग्रामपंचायत सदस्य याच्याकडूनअंजुर दिवे , भिवंडी ग्राम पंचायतमध्ये निवेदन

 

मुंबई प्रतिनिधी (सतिश पाटील): दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकरी संघटना व संघटनेचे ४ ग्रामपंचायत सदस्य श्री.संदिप कमलाकर म्हात्रे, सौ.प्रिया अरविंद म्हात्रे, सौ.रुपाली प्रवीण म्हात्रे, सौ.माधुरी विशाल म्हात्रे समवेत गावातील रखडलेल्या विकासकामांबद्दल व दिवे-अंजुर पेट्रोल पंप येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या कमानीला “ आई गावदेवी माता “ असे नामकरन व्हावे तसेच शासनाच्या नव्याने निघालेल्या घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये ५०% ची अमलबजावणी व्हावी यासाठी अंजुर दिवे ,भिवंडी ग्राम पंचायतमध्ये निवेदन देण्यात आले...

सदर गावातील रखडलेल्या विकासकामातील शिरुख येथे स्मशानभुमीला पत्राशेड व बसायला बाकडे या कामासाठी शेतकरी संघटनेकडुन ग्रामपंचायत सदस्य संदिप कमळाकर म्हात्रे यांच्या नावे विकासकामाची मंजुरी मिळणेबाबत अर्ज देण्यात आले आहे...एकात्मतेतुन समृद्धीकडे गावचा सर्वांगीण विकास, हाच संघटनेचा ध्यास!!

Post a Comment

Previous Post Next Post