महाराष्ट्र वेदभुमी

श्री साई दत्त सेवा संस्थान न्हावे भव्य पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी कडे रवाना .......

रोहा प्रतिनीधी - सत्यप्रसाद आडाव

 रोहा तालुक्याततील साईदत्त सेवा संस्थान न्हावे ते श्री क्षेत्र शिर्डी या पदयात्रेचे यंदा १९ वे वर्ष आहे... दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती निम्मीत २५ नोव्हेंबरला रवाना झालेली पदयात्रा ०३ डिसेंबर रोजी शिर्डी येथे पोहचणार आहे...

  सामाजिक जागरूकता आणि सामुदायिक एकतेचा संदेश देण्यासाठी श्री साई दत्त सेवा संस्थानातर्फे आज सकाळी भव्य पदयात्रा सोहळ्याची सुरुवात झाली... विविध वयोगटातील शेकडो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले...

  सकाळी लवकर गावातील नामांकीत दत्त मंदिरात पादुकांचे दर्शन घेऊन साईबाबा मंदिर प्रांगणातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली... आयोजन समितीतील संस्थापक प्रमोद कासकर, अध्यक्ष साईली कासकर, कार्याध्याक्ष मारुती सर्लेकर, विजय कासकर या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री साईंच्या प्रतिमेस पूजा अर्चना करून ही पदयात्रा शिर्डी येथे मार्गस्थ झाली... 

  पदयात्रेत युवक मंडळी, महिला , विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच पंचकोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले... यात्रेच्या संपूर्ण मार्गावर स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सर्व व्यवस्था सांभाळली... स्थानिक रहिवाशांनीही पदयात्रेला जल पाणी, अल्पोपहार व भोजनची सेवा देत सहकार्य केले...

Post a Comment

Previous Post Next Post