साखलोळी येथे घरावर वीज पडून लागली आग
दापोली (डॉ. प्रशांत परांजपे):- दापोली तालुक्यात साखळोली येथे 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता दोन घरांवर वीज पडून लाखोंचे नुकसान झाले आहे...
या घटनेबाबत डॉक्टर राजकुमार बर्वे यांनी माहिती देताना सांगितले की रामकृष्ण बर्वे आणि माझ्या घरावर तसेच त्यांच्या शेजारील चंद्रशेखर करमरकर यांच्या घरावर गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता वीज पडून करमरकर यांचे घराला अचानक आग लागली... संध्याकाळी सात वाजता मीटरजवळ वीज कोसळली आणि क्षणात मीटर आणि वायरिंग ने पेट घेतला... तसेच त्याखाली असलेली खुर्ची आणि बेड यांनी देखील पेट घेतला...
यावेळी घरातील मंडळी घराच्या अंगण्यामध्ये होती.वीज पडली आणि आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व मंडळी घरात धावली आणि आग आटोक्यात आणली... शेजारील करमरकर यांचे घर बंद असल्यामुळे त्यांचे घर उघडून आत जाऊन आग विझवली आहे त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती बर्वे यांनी दिली...
दापोली तालुक्यात दोनच दिवसांपूर्वी जालगाव येथे वीज पडून सहा नागरिकांचे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच आज सायंकाळी सात वाजता साखळोली येथे दोन घरांवर वीज पडून आग लागल्यामुळे परतीच्या पावसाचा मोठा फटका हा दापोलीकर वासीयांना बसल्याचे समोर आलेय..
पोलीस पाटील सुनिल सोनू गौरत वाडीतील ग्रामस्थांना घेऊन आले, उपसरपंच दिनेश भागोजी जाधव, माजी उपसरपंच अनिल विश्राम शिंदे, संदीप चंद्रकांत गोरीवले, मंगेश गोरीवले, प्रमोद बुरटे व अन्य ग्रामस्थांच्या मदतीने तत्परतेने आग आटोक्यात आणली... त्यांच्या योग्य वेळी केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला...
सुदैवाने, घर बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही... मात्र विशाल बर्वे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे...रामकृष्ण बर्वे आणि कुमार बर्वे यांच्या घरांमधील विद्युत उपकरणांचे तसेच इन्व्हर्टरचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील विनोद गोंधळेकर, विशाल गोंधळेकर, सागर बर्वे यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ यांनी घटना स्थळी धाव घेतली...
