महाराष्ट्र वेदभुमी

मुंबईतील मुलुंड-ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पोचा भीषण अपघात!

 

मुंबई प्रतीनीधी : (सतिश पाटील): बेस्ट बस व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन सात जण जखमी झाले... जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...या अपघातात सात जण जखमी झाले असून दोन प्रवासी रुग्णालयात दाखल आहेत..अपघात सकाळी १२:३५ च्या सुमारास घडला... पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताचा तपास सुरू केला मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे...

 मुलुंड - ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली... या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... ठाण्यातील घोडबंदर भूमीएकर्स ते मजास डेपो या मार्ग क्रमांक ४९२/३१ वर चालणारी बस भांडुपहून वाशीकडे जात होती... याचवेळेस समोरून येणाऱ्या भरधाव बेस्ट बसला टेम्पोने धडक दिली... 

बस अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे, या भीषण अपघातात बसमधील दोन प्रवासी आणि टेम्पोमधील ७ प्रवासी जखमी झाले. बसमधील एका प्रवाशाला आणि टेम्पोमधील एका प्रवाशाला वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित पाच जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना घरी सोडण्यात आले, असे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले...

या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे, सागर राजाराम जाधव, आनंदकुमार साईराम शर्मा , दुर्गादास नागेश देवकर, राजेश कुमार मिथाइलाल जैस्वाल, गुलाब चिनीलाल जैस्वाल, संजय श्यामलाल जैस्वाल, बेचेनलाल, बेचेनलाल जैस्वाल, बेचेनलाल जयस्वाल अशी जखमींची नावे आहेत... यातील दोघांना तातडीने मुलुंड येथील वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले... दरम्यान या अपघाताप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... पोलीस या घटनेचा अधिक तपास घेत असून यात नेमकी चूक कोणाची याबाबत अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही...

Post a Comment

Previous Post Next Post