माणगाव :- (नरेश पाटील) महाड तालुक्यातील चोचिंदे गावातील शिवसेनेला आज मोठा धक्का बसला आहे... गावातील उत्साही तरुणांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये मंगळवारी दि. 22 रोजी जाहीर प्रवेश केला... हा प्रवेश कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मा. रवींद्र हरिचंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मुकेश सुतार, श्रीकांत सुतार, ऋषी सुतार, कैलास सुतार, पप्या सुतार, प्रवीण सुतार, पिंट्या देवळे आणि आहेत खान यांनी पक्षप्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दर्शविला...
या तरुणांनी सांगितले की, गावाचा विकास ठप्प झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न सुटत नसल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे...
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवप्रविष्ट कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, पक्षाच्या विचारसरणीवर व लोकाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवणाऱ्यांना नेहमीच पक्षात योग्य स्थान दिले जाईल... त्यांनी पुढे असेही नमूद केले की, गावोगावी विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी युवकांची साथ अत्यावश्यक आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हेच खऱ्या अर्थाने युवकांचे व्यासपीठ आहे...
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
