रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर..
रोहा:- रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूक 2025साठी आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. अशातच रोहा तालुक्यातील मनोजकुमार शिंदे यांच्या पत्नी सौ. अंजलीताई मनोजकुमार शिंदे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने यंदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनोजकुमार शिंदे यांचा रोहा तालुक्यातील चणे रे पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क असताना घोसाळे गणातून त्यांच्या पत्नीची उमेदवारी निश्चित झाली आहे. चेनेरे पंचक्रोशीत मनोजकुमार शिंदे यांनी अनेक विकासाची कामे केली असून जनता त्यांच्या पूर्ण पाठिंब्यानिसी असून येणारी रायगड जिल्हा परिषद निवडणूक त्यांच्या पत्नीने लढवावी अशी मागणी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आया बहिणीच्या रक्षणासाठी धावणारा भाऊ या नात्याने मनोजकुमार शिंदे यांचा महिला जनमानसांत नावलौकिक आहे. शिंदे साहेब यांची शिवसेना वाढवण्यासाठी महत्वाचा हातखंडा मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे...
एक योग्य फळी तयार करून कार्यकर्त्यांना शिवसेना वाढीसाठी योग्य मार्गदर्शन देणारा लडव्यया नेता अशी त्यांची जनमानसांत ख्याती आहे. सर्वांना सोबत घेऊन दमदार आमदार महेंद्रसेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आजगायत चनेरे पंचक्रोशीत आपला दबदबा निर्माण केला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. येणारी निवडणुकीत आपली ताकद दाखवून देणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. नवरात्री उत्सवाच्या काळात त्यांनी अनेक मंडळांना देणगी स्वरूपात सहकार्य देत आपल्या कार्याची पोचपावती जनतेसमोर ठेवली आहे. चेनेरे नाक्यावरील जय भवानी रिक्षा चालक मालक संस्थेची नोंदणी सुद्धा त्यांच्याच संकल्पनेतून झाली आहे. चेनेरे पंचक्रोशीत आपला वेगळा ठसा उमटवत आपल्या पत्नीच्या उमेदवारी साठी जनतेचा कौल घेत थोरामोठ्यांचे आशिर्वाद मिळवत आपल्या पत्नीला घोसाळे गणातून रायगड जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून भरघोस मताने निवडून देण्याचे जनतेकडून आश्वासन घेतले आहे...
मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आजगायत अनेक कार्यकर्ते घडले आहेत. आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. म्हणून चणे रे पंचक्रोशीतील आदिवासी वाडींचा पूर्ण पाठिंबा त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीला मिळणार असे दिसून येत आहे. यंदाच्या दिवाळीत उटणे वाटप करून सामाजिक सलोखा जपत जनतेला आपण तुमच्यासोबत कायम आहोत याची शाश्वती मनोजकुमार शिंदे यांनी दाखवली आहे...
