महाराष्ट्र वेदभुमी

कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड रस्त्याची दुरवस्था प्रवास ठरतोय जीवघेणा

सोगाव - अब्दुल सोगावकर :अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड या मुख्यः रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत... पावसाच्या दिवसात काही ठिकाणी चक्क खड्ड्यांची तळी बनली होती, मात्र पाऊस ओसरला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात खोलगट खड्डे फारच धोकादायक व अपघातास आमंत्रण देणारे ठरत आहेत. काही खड्ड्यांमध्ये फक्त तात्पुरती खडी टाकली असल्यामुळे व ती रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत असल्याने त्यावरून दुचाकी वाहने, सायकल घसरून वारंवार अपघात होत आहेत, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे... एकंदरीतच या मार्गावरील प्रवास जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे...

   कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड या रस्त्याने लहान - मोठ्या वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते... शिवाय नजीकच आरसीएफ कंपनी असल्याने या रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. पेण व मुंबई, पुणे कडे ये - जा करण्यासाठी अवजड वाहने याच मार्गाचा अवलंब करत असल्याने कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड हा मार्ग महत्वाचा ठरतो आहे...

       या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम गेली अनेक महिने कासवगतीने सुरू आहे, येत्या काही दिवसांनी आवास - नागेश्वर व कनकेश्वर येथील यात्रा होणार आहेत, यावेळी जिल्हाभरातून भाविक बैलगाडी व इतर वाहनाने या यात्रेला मोठ्या संख्येने येत असतात, मात्र रस्त्यावर खडी पसरल्यामुळे रस्ता वापरण्यायोग्य नसल्याने या रस्त्याकडे संबंधित अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करत आहेत. तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गाने ठेकेदाराने याकडे दुरवस्था झालेल्या रस्त्याची लवकरात लवकर युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनचालक यांच्याकडून करण्यात येत आहे..

फोटो लाईन : कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी,

Post a Comment

Previous Post Next Post