दारूबंदी साठी बेलदा गावात महिलांचा एल्गार
ग्रामरक्षक दल, तंटामुक्त समितीचे ठाणेदारांला निवेदन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- गावातील अवैध दारूविक्री बंद व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने अखेर रामटेक तालुक्यातील बेलदा येथील ग्रामपंचायतीने धाडसी निर्णय घेतला आहे.तालुक्याच्या आदिवासीबहुल भागात असलेल्या ग्रामपंचायत बेलदा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दारुबंदी करावी अशी एकमुखी मागणी येथील महिला सरपंच स्नेहा उमेश भांडारकर यांचे नेतृत्वात महिलांनी तथा ग्राम रक्षक दल व तंटामुक्त समितीने देवलापारचे ठाणेदार तुरकुंडे यांना केली आहे. याबाबद ग्रामपंचायत बेलदा कडून रविवारी (दि.२१) सप्टेंबरला ठराव पारित करण्यात आला..ग्रामपंचायत बेलदा हे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या टप्पा २ मध्ये पदार्पण करीत आहे. तसेच येथील ग्रामरक्षक दल, तंटा मुक्ती समीती, गावकरी, व महिला मंडळी यांनी एकत्रीतरित्या दारूबंदीसाठी निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत बेलदा येथे मौजा बेलदा, नवेगाव खुर्द व गोरेघाट ही गावे आहेत. ग्रामपंचायत बेलदा येथे शासकीय आश्रम शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था , जिल्हा परिषद शाळा, आरोग्य विभाग, वाचनालय, अंगणवाडी आहे. बाहेर गावातून शिक्षण घेण्याकरिता बेलदा येथील विविध संस्थेमध्ये येत असतात. त्यामुळे रविवार (दि.२१) सप्टेंबरला दारूबंदीचा सर्वामते ठराव पारित करण्यात आला...
दारूबंदी साठी बेलदा गावात महिलांचा एल्गार
बेलदा येथील विविध संस्थेमध्ये बाहेर गावांवरून मुले शिक्षणासाठी येतात. या दृष्टीने दारुबंदी गरजेची आहे. गावात शांतता, स्वच्छता, आरोग्य, सुशासन, तंटा मुक्त आदर्श ग्रामपंचायतीसाठी दारू अडसर आहे. नवीन पिढी, शेतकरी, युवा, आई वडिलांच्या वृद्धापकाळातील भविष्य iलक्षात घेता दारुबंदी होणे आवश्यक आहे. असे त्या म्हणाल्या. देवलापार पोलिस ठाण्यातंर्गत अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली...