महाराष्ट्र वेदभुमी

शेतात विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतमजुराच्या मृत्यू

औषध फवारणी करताना घडली घटना  

याप्रकरणी शेतमालकावर गुन्हा दाखल

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : खुमारी शिवारातील शेतात औषध फवारणी करताना जमिनीवर पडलेल्या तारेचा स्पर्श होऊन  शेतमजुराचा मृत्यू झाला... ही घटना बुधवार (दि.२४) सप्टेंबर ला दुपारी एक वाजताचा सुमारास बोदराजवळील खुमारी परिसरात घडली... 

खुमारी हद्दीत येत असलेली सर्व्हे क्रमांक ४५/२ ही शेती अंकित लीलाधर धानोरे यांच्या मालकीची आहे... बोरडा (सराखा) येथील शेतमजूर राघो जेठीराम नारनवरे (३८ वर्षे) इतर मजु्रांसोबत धानोरे यांच्या शेतात पिकांवर कीटकनाशक फवारण्यासाठी तिथे गेले होते... अंकितने राघोला झोपडीत लाईट लावण्याकरिता वायर घेऊन जाण्याचा सल्ला दिला... मीटरपासून झोपडीपर्यंतचे अंतर किमान १०० ते १५० मीटर होते. राघो लाकडी काठीला लटकलेली वायर घेऊन जात होता... वायर आधीच वीजेवर चालत होती, पण ती अनेक ठिकाणी कापली गेली होती... त्यामुळे वायर खराब झाली.... तुटलेल्या भागाच्या संपर्कात आल्यानंतर राघोला विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर पडला. त्याला ताबडतोब रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले... शवविच्छेदनानंतर राघोचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला... संभा नारनवरे यांच्या तक्रारीवरून राघो यांच्या मृत्यूला शेतमालक जबाबदार असल्याने रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे...

कुटुंबाचा एकमेव कमावता गेला 

मृतक राघो यांच्या पश्चात पत्नी, मुलगी (१२ वर्ष), मुलगा (७ वर्ष) व म्हातारे वडील असा आप्तपरिवार आहे. राघो हे घरातील एकमेव कमावणारे व्यक्ती असल्याने अचानक अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या  घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिवार उघड्यावर आला आहे. मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post