१७ विभागाच्या २५ योजना आदिवासी बांधव यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कटिबद्ध.
प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा: आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या “धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान” अंतर्गत आदी कर्मयोगी कार्यक्रमाची सुरुवात रोहा तालुक्यातील चनेरा विभागातील न्हावे येथून झाली आहे...
अभियानास १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत 'सेवा पर्व तसेच 'आदि सेवा' अभियान म्हणून संबोधले जाणार आहे. तर हे संपूर्ण कार्यकाम तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यासह अध्यक्ष व समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तालुका स्तरावर गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पेण येथील प्रकल्प अधिकारी धावे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख सक्रिय सहभाग घेत असून न्हावे व नवखार या गावांतून गटविकास अधिकारी रोहा शुभदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला...
१७ विभागाच्या २५ योजना आदिवासी बांधव यांच्यापर्यंत पोहोचविण्यास जिल्हाधिकारी किशन जावळे कटीबद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमासाठी मास्टर ट्रेनर नरेश झुरे , तलाठी नंदकुमार पाटील , वातावरण संस्थेचे विलास चाळके , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रदिप कोळी , राहुल ऐडके , सरपंच नितीन डबीर व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक दिपक वारगे , शिक्षक गणेश बिरवाडकर , अंगणवाडी सेविका , मदतनीस , पोलीस पाटील , सिआरपी अश्विनी डबीर , गाव कमिटी अध्यक्ष आणि प्रतीष्ठीत ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने धरती आभा आदि कर्मयोगी अभियानात सहभागी होते
या अंतर्गत रोहा तालुक्यातील उसर, कोंडगाव, हेदवली, वणी, वासगाव आणि चिंचवळी तर्फे आतोणे या गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. गाव विकास आराखडा आदिवासी तरुणांच्या उपजीवीकेसाठी शासवत मार्ग होऊ शकते . त्यासाठी ह्या आभीयानात सहभाग नोंदविने गरजेचे आहे .असे वातावरण संस्थेचे विलास चाळके यांनी आवाहन केले आहे ...
या अभियानाचा दीर्घकालीन उद्देश म्हणजे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे व “ विकसित भारत – २०४७ ” या राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेस हातभार लावणे असे व्यापक ध्येय असल्याने सर्वत्र उत्पूर्णपणे प्रतिसाद मिळत आहे...
अभियानाचा उद्देश :
आदिवासी गावांमध्ये सर्वांगीण विकास साधणे , गावपातळीवर कृती आराखडे तयार करून शासनाकडे सादर करणे , गावातील प्रत्येक नागरिकाला सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे , महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण आदी १७ विभागांच्या २५ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे...
अभियानाचे स्वरूप :
गाव कृती आराखडा: गावकरी स्वतः गरजा व प्राधान्यक्रम ओळखून योजना आखतील , आदी सेवा केंद्रे: आरोग्य, शिक्षण, पोषण, पाणी व स्वच्छता सेवा उपलब्ध करून देणारी केंद्रे स्थापन केली जातील , जनजागृती व सहभाग: स्थानिक नेते, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग राहील , तळागाळातील नेतृत्व: आदिवासी समाजात नवीन नेतृत्व घडवून आणले जाईल...