महाराष्ट्र वेदभुमी

तालुक्यात सेवा पधरवाड्याची उत्साहात सुरवात


१७सप्टेंबर ते २आँक्टोबरपर्यत तीन टप्य्यात अभियान

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- महसूली क्षेत्रीय कार्यालयाकडून सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २०२५-२६ या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या असल्याने सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक असण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरुपात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात बुधवार ( दि. १७) ला शांती मंगल कार्यालय सेवा पंधरवड्याचा सुरवात उपजिल्हाधिकारी ( राजशिष्टाचार )इंदिरा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात करण्यात आला... 

उपविभागीय अधिकारी (महसुल) प्रियेश महाजन यांचे अध्यखतेखाली आयोजीत करण्यात आला होता. तहसिलदार रमेश कोळपे यांनी उपस्थितांना मोलाची माहिती  दिली. एसडीओ प्रियेश महाजन यांनी सेवा पंधरवाडा अंतर्गत पहिला टप्पा " पांदन रस्तेविषयक मोहिम" दिनांक १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत असुन शिव पांदन रस्त्याचे सर्व्हेक्षण करणे, नस्तारपत्रक, वाजीव-उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्यांची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमत्ती पत्र घेणे, रस्ता अदालत आयोजीत करून शेतरस्त्यांचे प्रलंबीत प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सिमांकन करण्याची कार्यवाही करणे, २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दुसरा टप्पा अंतर्गत "सर्वासाठी घरे " या उपक्रमांतर्गत रामटेक तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सन २०११ पुर्वी शासकीय जागेवर असलेले रहिवासी प्रयोजनाकरीता केलेले अतिक्रमणे नियमानुकुल करुन पट्टे वाटप करणे. आणि  २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत "नाविण्यपूर्ण उपक्रम " अंतर्गत महसुल विभागातील प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्याकरीता "महसुल लोक अदालत ", "शालेय शिबीर", संजय गांधी योजनेअंतर्गत डीबीटी प्रणालीमध्ये व्हॅलीडेशन शिबीर घेण्पात येईल. नागरिकांनी सहभाग नोंदवुन योजनेचा लाभ घ्यावा. सदर कार्यक्रमामध्ये माजी जि. प. सदस्य श्री दुधराम सव्वालाखे, माजी नगरसेवक श्री. बिकेंद्र महाजन तसेच इतर पदाधिकारी व नागरीक आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते...

हिरवी झेंडी दाखवुन प्रचार व प्रसिद्धी रथ रवाना

तब्बल ११२ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचा लाभ देण्यात आला.  उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) इंदिरा चौधरी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देवुन मार्गदर्शन केले. तहसिलदार रमेश कोळपे वरील टप्प्यातील योजनेतील महत्त्व जनतेला पटवुन दिले. पांधन रस्ता मोहिमे अंतर्गत रस्त्यांची मोजणी व सिमांकन रोव्हरव्दारे करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. नागरिकांना पट्टे वाटप, संजय गांधी योजनेचे पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अंतर्गत आदेश वाटप, महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य वाटप, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, आधार कॉर्ड नोंदणी/अपडेशन ई. लाभा ची कार्यवाही करण्यात आली.  प्रचार व प्रसिध्दी करण्याकरीता फिरते प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवुन रवाना करण्यात आले. भोजापूर येथे पांधन रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post