घरत परिवाराचा शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या थाटात साजरा..
प्रतिनिधी नंदेश गायकर... पितृपक्ष संपल्यानंतर वेध लागतात नवरात्रीचे... नऊ दिवस चालणारा हा उत्सव रोहा तालुक्यातील मौजे भागीरथीखार येथे घरत कुंटूबियाणी मोठ्या थाटात साजरा केला.भागीरथीखार गावचे रहिवासी श्री.कृष्णा घरत यांच्या निवासस्थानी विराजमान घरत कुटुंबीयांचे कुलदेव घटी बसले. घरत कुटुंबीयांचे आप्तेष्ट पांडुरंग घरत, गणेश घरत, हरेश घरत यांनी अथक परिश्रम घेऊन वरील कार्यक्रम पार पाडला.कुलदैवत आरतीचा पहिला मान समस्त घरत कुटुंबियांच्या वतीने श्री.गोवर्धन माळी, तानाजी म्हात्रे यांना देण्यात आला.देवाच्या आरतीचा मान हा जीवनात भाग्याचा क्षण असतो.लोक आग्रहास्तव समस्त घरत कुटुंबीयांनी शिवकन्या नाच मंडळ गोफण यांना आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यात गायिका जागृती जाधव आणि मानसी कडू यांनी अप्रतिम अशी गाणी गाऊन उपस्थित जनतेची मने जिंकली. गीत रचना इतकी सुंदर होती की, उपस्थित जनता त्यांच्या कलेला बक्षिस स्वरूपात दाद देत होती.