महाराष्ट्र वेदभुमी

वीरशैव-लिंगायत महामेळाव्यात प्रा. मनोहरजी धोंडे यांची ठाम भूमिका.

जनगणनेत वीरशैव-लिंगायत  म्हणून नोंद करण्याचे

 कर्नाटक-महाराष्ट्रासह देशभरातून समाजबांधवांनी केले स्वागत

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे)

कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत एकता संमेलनात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी येणाऱ्या जनगणनेत सात नंबरच्या रकान्यात आपला धर्म " वीरशैव - लिंगायत धर्म " अशी नोंद करून जातीच्या रकान्यात आप - आपली जात लिंगायत शब्द जोडून ( उदा : लिंगायत वाणी , लिंगायत तेली , लिंगायत जंगम असे )  लिहावे असे आवाहन केले. या व्यासपीठावर केदार जगद्गुरु यांना सोडून पंचपीठाचे  उर्वरित चारही जगद्गुरु आणि शिवगंगा मठासह विरक्त मठाचे जगद्गुरु आणि सुमारे १२०० मठाधिपती उपस्थित होते.  तसेच व्यासपीठावर प्रा. मनोहर धोंडे यांच्यासहित कर्नाटक राज्याचे भाजपचे माजी मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई , माजी उपमुख्यमंत्री राजशेखर शेट्टर , वन मंत्री मा. ना. ईश्वर खंडरे , के एल ई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपचे खासदार प्रभाकर कोरे , अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष  शिवापनूर, आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यामध्ये विरक्त मठ संस्थान आणि पंचाचार्य मठ संस्थांचे सुमारे १२०० शिवाचार्य , मठाधिपती यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते...

 समाजाच्या अस्मितेची जपणूक, धार्मिक ओळख दृढ करणे आणि जनगणनेतील धर्माच्या कॉलममध्ये ‘वीरशैव-लिंगायत’ असा जनगणनेत सात नंबरच्या कॉलम मध्ये स्वतंत्र उल्लेख व्हावा या प्रमुख निर्णयासाठी हा ऐतिहासिक मेळावा भरविण्यात आला...

या महामेळाव्यात अनेक मान्यवर संत-महंतांनी स्पष्ट केले की, “वीरशैव-लिंगायत समाजाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन केंद्र व राज्य शासनाने जनगणनेत स्वतंत्र धर्म नोंदीसाठी सहकार्य करावे.”

प्रा. मनोहरजी धोंडे सरांची ठाम व स्पष्ट भूमिका मेळाव्यातून पुढे आली.या वेळी महाराष्ट्रातून विशेष निमंत्रणावर आलेले शिवा संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून समाजाच्या भावना थेट मांडल्या.त्यांनी सांगितले की,"जनगणनेतील सात नंबरचा कॉलम मध्ये स्वतंत्र ‘वीरशैव-लिंगायत’ नोंद ही फक्त कर्नाटकापुरती मागणी नाही. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही मागणी आता अखिल भारतीय पातळीवरची ठरते. शिवा संघटना सुरुवातीपासून या प्रश्नावर अभ्यासपूर्वक भूमिका मांडत आहे. समाजाच्या हितासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत लढवला जाईल. आम्ही सत्य, न्याय आणि अस्मितेसाठी कोणत्याही स्तरावर झुंज देण्यास तयार आहोत, आम्ही हिंदू असलो तरी आमची संख्या देशाला आणि जगाला कळली पाहिजे, वीरशैव लिंगायत समाजाची संख्या प्रचंड असुनही वीरशैव लिंगायत समाजाची साधा उल्लेखही कोठे होत नाही संख्या माहिती नसल्याने शासनही समाजाकडे पाहत नाही आजच्या काळात संख्येला महत्व आहे त्यामुळे, यावेळी जनगणनेतील सात नंबरच्या कॉलम मध्ये वीरशैव लिंगायत धर्म अशी नोंद करणार असुन जातीच्या कॉलम मध्ये जी जात असेल त्याला लिंगायत जोडून जसे लिंगायत वाणी, लिंगायत माळी, लिंगायत तेली, या प्रमाणे लिंगायत लावुन पुढे आपली जात उपजातीची नोंद करणार असल्याचे सांगितले...

प्रा. मनोहरजी धोंडे सरांची भूमिका ऐकल्यानंतर उपस्थित अनेक राज्यांतील समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले. त्यांच्या भूमिकेबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्रास इतर राज्यातील जनतेत मोठ्या प्रमाणावर सकारात्मक चर्चा सुरू आहे...

अनेक राज्यांतील सामान्य समाजबांधवांचे म्हणणे असे आहे की “धोंडे सरांनी महाराष्ट्रात जसा कायदेशीर व न्याय्य लढा ओबीसी आरक्षणासाठी दिला, तसा ठाम व अभ्यासपूर्ण लढा आता वीरशैव लिंगायत समाजाच्या जनगणनेतील ओळखीकरिता सुरू केला आहे, यामुळे समाजाचा राज्य व देशपातळीवर फायदा व ओळख होणार आहे.त्यांचे भाषण ऐकताना समाजमनाला भिडणारे विचार जाणवले. ही भूमिका आमच्या अंतःकरणाला भिडली आहे.समाजाची खरी ओळख टिकवण्यासाठी ज्या धाडसी आणि तडफदार नेतृत्वाची गरज आहे, ते प्रा. मनोहर धोंडे सरांकडे आहे.”

कोट चौकट :- 

देशभरातून स्वागत: -

या महामेळाव्यानंतर प्रा. मनोहरजी धोंडे सरांची भूमिका केवळ हुबळीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील लिंगायत समाज बांधवांकडून जोरदार स्वागत होत आहे.त्यांच्या ठाम, स्पष्ट व न्याय्य भूमिकेमुळे समाजात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे...

निष्कर्ष:-

हुबळीतील या भव्य महामेळाव्याने वीरशैव-लिंगायत समाजाची ताकद, एकता आणि अस्मिता पुन्हा एकदा दाखवून दिली. या महासागरात उमटलेला प्रा. मनोहरजी धोंडे यांचा ठाम आवाज समाजाच्या पुढील लढ्याला दिशा देणारा ठरत आहे, असे मत वीरशैव लिंगायत समाज बांधवांनकडून व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post