नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून १० किलोमीटर परीघात प्राण्यांची कत्तली करणे, त्याची कातडी वा अवशेष टाकणे, कचरा व इतर प्राणघातक पदार्थ टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण अनेक पशूपक्षी हे मांस, पदार्थ खातात, आजूबाजूच्या परिसरात अन्न शोधण्यासाठी येतात व विमान उडत असताना या पक्ष्यांचा विमानाला अपघात होतो व आगी लागणे किंवा इतर तांत्रिक बिघाड विमानात होतात...
घातक पदार्थ, प्राण्यांची कत्तल, त्यांचे कुजलेले अवशेष यामुळे रोगराई पसरून विविध नवनवीन विषाणूचा जन्म होऊन विविध जीवघेणे रोगराई पसरते. रोगाची लागण नागरिकांना होते म्हणून शासनाच्या एरोड्रेम पर्यावरण व्यवस्थापन समितीने विविध निर्बंध लादत १० किलोमीटर परिसरात प्राण्यांची कत्तल करु नये, अवशेष टाकू नये, कचरा करु नये, असे निर्णय घेतला आहे. मात्र या नियमांची पायमल्ली विमानतळापासून १० किलोमीटर परिसराच्या आत असलेल्या उलवे शहरामध्ये दिसून येत आहे...
उलवेत बेकायदा चिकन मटणच्या दुकानाकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने, चिकन मटण विक्रेत्यांनी शाळा, कॉलेज, मंदिरे, चौक, महत्वाचे रस्ते, कॉर्नर रस्त्यावर तर कुठे गटारावर आपली दुकाने सुरु केली आहेत. त्यामुळे नागरिकांचे तसेच विविध पशु पक्ष्यांचेही अस्तित्व, जीवनमान, आरोग्य धोक्यात आले आहे. अशा दुकानांवर कारवाई करावी, यासाठी २२ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर १९, उलवे शहर, पनवेल तालुका, जिल्हा रायगड येथे उलवे शहर नियोजन समितीच्या माध्यमातून संतोष काटे हे अन्नत्याग उपोषण करणार आहेत...
श्री छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्हा मध्ये (उलवे) रस्त्यावर खुले आम कोंबडी / बोकडे यांची कत्तल होऊ देणार नाही अशी भूमिका उलवे शहर नियोजन समितीने घेतले असून उघड्यावर कत्तल करून हिंदु धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप संतोष काटे यांनी केला आहे...बेकायदेशीर चिकन मटणाच्या दुकानावर कायदेशीर कारवाईसाठी उलवे शहर नियोजन समितीने अन्नत्याग उपोषण करण्याचा निर्धार केला आहे...उघड्यावरील चिकन मटणाच्या दुकानामुळे रोगराई, दुर्गंधी पसरून प्रदूषण वाढले आहे.उलवे मध्ये विना परवाना व अनधिकृत मटण चिकनाची दुकाने तेजीत आहेत.कायदेशीर कारवाईची मागणी आम्ही १ वर्षापासून करीत असून सुद्धा या समस्या कडे जाणीवपूर्वक शासन दुर्लक्ष करत आहे...असे संतोष काटे यांनी सांगितले...मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतोष काटे यांनी दिला आहे...
नवरात्रौत्सव मध्ये सर्व हिंदू माता भगिनींचे कडक उपवास ९ दिवस असतात, रस्त्यावर उघड्यावर कोंबड्या / बोकडे कापले जातात त्यामुळे उग्र वास सुटलेला असतो त्यामुळे उपवास तुटतो अशाप्रकारे हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचं प्रयत्न केला जात आहे... शेकडो चिकन / मटण मांस विक्रीची दुकाने फूटपाथवर सर्रास बिनधास्त पणे थाटलेली आहेत... प्राण्यांची कत्तली करून त्याची कातडी वा अवशेष उघड्यावर टाकत आहेत...कचरा व इतर प्राणघातक पदार्थ उघड्यावर टाकत आहेत... मोठ्या प्रमाणात शाळे जवळ रोग राई पसरत आहे अनेक पशु पक्षी हे मांस, पदार्थ खातात, आजूबाजूच्या परिसरात अन्न शोधण्यासाठी येतात व विमान उडत असताना या पक्ष्यांचा विमानाला अपघात होतो... सदर उपोषण हे फक्त रस्त्यावर फूटपाथ वर जे उघडपणे कोंबडे / बोकडे कापून विकत आहेत त्यांच्या विरोधात आहे... जे दुकान मधून नियमनाचे पालन करून मांस विकत आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्यावर आमचा कोणताही आक्षेप, विरोध नाही...आपले उलवे शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची, अधिकाऱ्यांची जवाबदारी आहे, आणि ती आम्ही निभवणारच. महाराष्ट्र शासन निर्णय (जी आर )प्रमाणे नवीमुंबई विमानतळ एरोड्रम पर्यावरण व्यवस्थापन समिती आदेशाचे उल्लंघन होत असून रस्त्यावर कोंबडे बोकडे कापण्यास मनाई आदेशांची पायमल्ली शासकीय अधिकाऱ्याकडुन होत असुन विमान अपघात झाल्यास, जीवितहानी झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार ? असा सवाल संतोष काटे यांनी उपस्थित केला आहे...उलवेकरांनो बघताय काय सामिल व्हा ! अभी नही तो कभी नही अशी आर्त साद संतोष काटे यांनी उलवे करांना घातली आहे...