महाराष्ट्र वेदभुमी

मुरुड-साळाव रस्त्यावर एसटी बस व पिकॲप टेम्पो चा भीषण अपघात !

 

घटनास्थळी नागरिक व मुरुड पोलीसांकडून बचावकार्य, जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले...

 शहानवाज मुकादम रोहा 

मुरुड: तालुक्यातील मुरुड-साळाव रस्त्यावर दुपारी ०२:०५ वाजताच्या सुमारास विव्हुर गावा जवळ मुरुड आगाराची एसटी बस आणि पिकॲप टेम्पो चा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे...

 सदर घटनास्थळी नागरिक आणि मुरुड पोलीसांकडून बचावकार्य करुन जखमींना मुरुड रुग्णालयात पाठविण्यात आले...

 या अपघातात एकूण १४ इसमांना दुखापत झाली असून त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरूड येथे औषधोपचार करण्यात आला असून पुढील उपचारा करिता अलिबाग येथे पाठविण्यात आले...

 सदर आपघाताचा पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात करीत आसल्याची माहीती पोलीस हवालदार जनार्दन गदमळे यांनी दिली आहे...

 

Post a Comment

Previous Post Next Post