प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
रायगड जिल्हा परिषद अलिबाग डोंगरी विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२३-२०२४ च्या विशेष फंडातून उभारण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील नवखार येथील नवीन अंगणवाडी इमारतीचे शुभारंभ महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाळविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी २६ सप्टेंबर रोजी, मोठ्या उत्साहात पार पडले.
रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते या अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे , माजी उपसभापती पंचायत समिती रोहा रामचंद्र सकपाळ , दर्शना कांढणेकर , नामदेव बठारे , सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोईर , निवासी नायब तहसीलदार राजेश थोरे , बिडीओ शुभदा पाटील , मंडळ अधिकारी चणेरा प्रकाश मोकळ , तलाठी नंदकुमार पाटील , ग्रामसेवक दिपक वारगे ,न्हावे सरपंच नितीन डबीर , उपसरपंच पांडुरंग कासकर , सी. आर. पी. अश्विनी डबीर , चणेरा विभागातील सरपंच , उपसरपंच , सदस्य , तंटामुक्त अध्यक्ष , अंगणवाडी सेविका , मदतनीस , महीला बचतगट पदाधिकारी , ग्रामस्थ मंडळ नवखार व ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते...
प्रसंगी या कार्यक्रमात ही अंगणवाडी अधिकाधिक बालकांना पोषक , गरोदर आणि स्तनपान मातांना उपयुक्त ठरेल . इथल्या अंगणवाडीचा स्मार्ट अंगणवाडीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करु , त्यामध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या प्रयत्न करु , न्हावे ते दत्त मंदीर रस्ता , न्हावे ते नवखार रस्ता , बचतगट महीलासाठी कार्यशाळा आणि पेय जल योजना पुर्ण करण्याचे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोईर यांनी केले.