एकूण ५ लाख ८०हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त
सचिन चौरसिया रामटेक
रामटेक :- राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे... मात्र नव-नवी शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते... अशा छुप्या कारवाईवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवली जाते. रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जबलपूर येथून नागपूर रोड दरम्यान एका कारमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू घेवून जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली... या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली... ज्यामध्ये ६२ किलो मालासह गाडी असे एकूण ५ लाख ८० हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे...
माहितीनुसार गाडीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखु व पानमसाला जबलपुरकडुन नागपुरकडे घेवुन जात आहे... अशा गोपनीय खबरेची माहिती पो.नि. अरविंद कतलाम यांना मिळताच आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन शगुभ फॅमीली रेस्टॉरेंट, कांन्द्री माईन्ससमोर नाकाबंदी करण्यात आली...
दरम्यान जबलपुरकडुन नागपुरकडे येणारे वाहन स्वीफ्ट कार क्र. एमएच ४९ ऐई ३६८३ ला थांबवुन वाहनाची तपासणी केली असता वाहनात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु व पानमसाला किंमती ८०८१०/- रू. व स्वीफ्ट कार क्र. एमएच ४९ ऐई ३६८३ रुपये ५०००००/- असा एकुण ५८०८१०/- रू. चा माल जप्त करून आरोपी कमलसिंग भवरसिंग पवार वय ४१ वर्ष, रा. पटेल कॉलनी, रामनगर, विजय नगर, अजमेर, राज्यस्थान, ह.मु, प्लॅट नं. ४०८, पर्ल्स हेरीटेज सीटी, बहादुरा फाटा नागपुर यास ताब्यात घेण्यात आले... सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला... आरोपीविरुद्ध अप.क. ७९२ /२०२५ कलम १२३, २७४, २७५, २२३ बि. एन.एस. सहकलम २६(१), २६(२) (आयव्ही), २७ (३)(ई), ३०(२)(अ), ३(१) (झेडझेड) (आयव्ही), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला...