महाराष्ट्र वेदभुमी

"देशाच्या लोकप्रिय पंतप्रधान मोदींना माणगांवकरांचा स्वच्छतेची वाढदिवस भेट"


माणगाव :- (नरेश पाटील):भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाला लाभलेले सर्वात सक्षम, दूरदृष्टीचे आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन होत असून “सेवा पंधरवडा” अंतर्गत विविध सेवा कार्ये पार पडत आहेत...

    याच उपक्रमाचा भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण साहेब व जिल्हाध्यक्ष तथा खासदार ना. धैर्यशील दादा पाटील यांच्या आदेशानुसार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ज्येष्ठ नेते आप्पा ढवळे व माणगांव तालुकाध्यक्ष परेश सांगले यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव बस स्थानक येथे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले...

     या अभियानात माणगांव बस आगार व्यवस्थापक रवींद्र वाढवळ तसेच ग्रीन कम्युनिटी फाउंडेशनचे व्यवस्थापक मनोहर सकपाळ व गणेश वडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. माणगांवकरांनी एकत्र येऊन “स्वच्छ भारत” संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकारली...

      या प्रसंगी जिल्हा चिटणीस गोविंद कासार, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा श्रीम. रुपाली कासारे, श्रीम. पूजा पवार, तालुका सरचिटणीस बाबुराव चव्हाण, ज्येष्ठ नेते सुरेंद्र साळी, कुरळे अण्णा, अनिल दांडेकर, किसान मोर्चा अध्यक्ष नयन पोटले, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पवार, राजू तेटगुरे, केतन आडित, माथाडी सेल अध्यक्ष महादेव कदम, साईनाथ पेणकर, नितीन शेलार, माणगांव शहर अध्यक्ष राकेश पवार व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते...

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियान सुरू करून स्वच्छतेच्या दिशेने अत्यंत आवश्यक आणि ऐतिहासिक पाऊल उचलले. त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक सलाम. आज त्यांच्या दूरदृष्टी आणि कार्यपद्धतीमुळे देश केवळ वेगाने प्रगतीच्या मार्गावर नाही, तर निरोगी, समृद्ध आणि आनंदी भारत म्हणून जगासमोर उभा राहत आहे...

“सेवा हीच खरी पूजा” या विचाराला मूर्त रूप देत माणगांवकरांनी देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांना स्वच्छतेच्या अभियानातून एक आगळीवेगळी वाढदिवस भेट दिली...

Post a Comment

Previous Post Next Post