प्रतिनिधी आवरे (सचिन पाटील): कराटे हे एक खेलाचे अंग असून हे आत्मसंरक्षण तर शिकविते तसेच आपली शारीरिक मजबुती व आध्यात्मिक व मानसिक आरोग्य हे चांगलं राखायला मदत करत असते खरं पाहायला गेलो तर कराटे ही संरक्षण कला आहे या कलेचा जन्म मुळात भारतात झाला आहे परंतु विदेशातील लोकांनी तिचा खूप फायदा घेतला आहे कराटे च ज्ञान दैनंदिन जीवनात महत्वपूर्ण आहे आत्माराम ठाकूर मिशन व जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडीयम स्कूल ने क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड आयोजित व रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज आवरे येथे भरविण्यात आलेल्या भव्य व दिव्य अश्या तालुका स्तरीय कराटे स्पर्धेत जे जे ठाकूर इंग्लिश मेडियम आवरे ने सुवर्ण पदकांची अगदी लयलूट केली आहे जानकीबाई जनार्दन स्कुल आवरे ने कराटे या स्पर्धेत बाजी मारली आहे व स्पर्धेवर आपलं वर्चस्व राखलं आहे सुवर्ण पदक मिळविलेले विद्यार्थी 14 वर्षाखालील तनवी मानिंदर गावंड, सानवी सुजय गावंड , अक्षरा संदीप वर्तक शौर्य संदीप म्हात्रे 17 वर्षाखालील सोनाक्षी संतोष गावंड , अक्षा उत्तम गावंड वीरा विजय गावंड श्रीची संतोष वर्तक जाग्रवी जोमा भोईर निपुर किरण पाटील हे सर्व स्पर्धक सुवर्ण पदक विजेते होय तसेच रजत पदक 17 वर्ष खालील तनिष्का आकाश गावंड नियती नरेंद्र ठाकूर भूमी आनंद म्हात्रे ह्या सर्व स्पर्धक यांनी विशेष नैपुण्य मिळविले सदर खेळाडू ची निवड जिल्ह्यस्तरावर झाली आहे ..
सर्व विजेत्या स्पर्धकांचे व क्रिडा शिक्षकांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे या स्पर्धेतील धवल यश हे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल इंग्लिश मीडियम चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना हे विद्यार्थ्याचे यश सर्व विद्यार्थ्यांनी, व्यवस्थापन कमिटीने व शाळेच्या सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अर्पण केले आहे अशोक ठाकूर सर यांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेच्या कामगिरी चे पाहिलेलं स्वप्न विद्यार्थ्यांनि पूर्ण केले आहे..
सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे संस्थेचे विश्वस्त श्री वामन ठाकूर , सौ अलका ठाकूर सिंधु ठाकूर प्रसाद ठाकूर रिना ठाकूर आदिनाथ ठाकूर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक वर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..