रामटेकच्या नागारा तलाव परिसरातील घटना
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक हद्दीत येणाऱ्या रामटेक तुमसर बायपास मार्गांवरील नागारा तलावात रविवार (दि. ३१) ऑगस्टला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला... वामन कान्होजी दोडके (वय ७८) रा. बोरडा सराखा ता. रामटेक असे मृत व्यक्तीचे नाव आहे... तलावात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली... घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी तपास केला असता मृतक इसमाचे नाव वामन दोडके असे आहे... ते मागील गेल्या दोन वर्षांपासून हाताचा जखमेमुळे त्रस्त होते... त्यांच्या मुलांनी त्यांची जखम दुरुस्त होण्यासाठी आयुर्वेदिक व इतर दवाखान्यातील औषधीउपचार केला... मात्र त्यांना कुठेही आराम मिळत नव्हता... एवढ्यात त्यांचा त्रास वाढून गेला असल्याने त्यांना वेदना असाहाय्य झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले... पहाटेच्या सुमारास नागारा तलावात एक मृतदेह आढळून आला. यांची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली... रामटेक पोलिसांनी शव पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले... बोरडा येथील स्मशानघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले...