प्रतिनीधी श्याम लोखंडे रोहा रायगड: मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक हॉटेल नम्रता गार्डन येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, युवती जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी १ सप्टेंबर रोजी चार वाजताच्या सुमारास घडली...
मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक हॉटेल नम्रता गार्डन येथे एस बस चालकाने एका एक्सेस स्कुटी दुचाकीला धडक दिल्याने स्कूटीवरून प्रवास करणारी युवती ठार झाल्याची घटना घडली आहे...
खेड महाड पनवेल मुंबई ही एसटी महामंडळाची बस प्रवासी घेऊन मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना खांब नजिकच्या मार्गावरून ऐनवहाळ पुगाव कडून खांब कडे स्कुटी वरून प्रवास करणारी युवती देवयानी किशोर गोळे वय वर्षे अंदाजे (१९) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला असून देवयानी ही जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे... त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे...