महाराष्ट्र वेदभुमी

गणेशोत्सवाच्या आनंदावर रोह्यात पावसाचे विरजण, दोन दिवस सततच्या पावसामुळे गणेश भक्तांचा हिरमुड.

कोलाड (श्याम लोखंडे): गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. मात्र ऐन गणेशोत्सवात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बुधवारी २७ ऑगस्ट रोजी बुद्धीचे देवता गणरायाचे आगमन घरोघरी मोठ्या उत्साही वातावरणात होत सिंहासनी विराजमान करण्यात आले... त्या आधी देखील गणेश भक्तांची त्याच्या जल्लोषात तयारीच्या सामान सुमान खरेदीची जोरदार धावपळ सुरू असताना देखील धो धो पाऊस कोसळत असताना देखील बप्पा वर्षानी एकदा आपल्या घरला येणार या भावनेनी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली.. तद्नंतर जी पुन्हा शुक्रवारी, शनिवारी ,रविवारी रात्री जोरदार बरसल्याने ऐन गौरी आगमनाच्या दिवशी देखील पावसाची संततधार सुरू होती... त्यामुळे गणेशक्तांच्या आनंदावर विरझण झाल्याचे पहायला मिळाले तर नाचगाणे इतर महिलांचे विविध खेळांवर त्याचा परिणाम झाल्याने अनेकांचा हिरमूड झाला...

गणेशोत्सवापूर्वी आठ दिवस रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती... त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाऊस ऐन गौरी गणपती उत्सव काळात पुन्हा बरसायला सुरूवात केली... जिल्ह्याच्या अनेक भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत तसेच रोहा तालुक्यात खांब कोलाड भागात कधी रिमझिम तर कधी जोरदार सरी बरसत असल्यामुळे खास गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या गणेशभक्तांना घरात बसल्यावाचून पर्याय उरलेला नसल्यामुळे मनामनात हिरमुड झाले आहे...

अनेक ठिकाणी गणपतीच्या आगमनावेळी तर काही ठिकाणी दीड दिवसांच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान पावसाने हजेरी लावली...  त्यामुळे अनेकांच्या बाप्पांचे आगमन आणि विसर्जन गाडीतूनच झाले तर काही बाप्पावर छत्री पकडून विसर्जन घाटाकडे नेण्यात आले... गणेशोत्सव काळात आलेले मुंबईकर चाकरमानी आपल्या नातेवाईकांकडे गणपतीच्या दर्शनाला आवर्जून जात असतात. याशिवाय शहरी भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केलेली विविध प्रकारची सजावट आरास आणि देखावे महिला आणि लहान मुलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो... परंतु पावसाच्या संततधारेमुळे घराबाहेर पडणे होत नाही. सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे त्यातच हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत वरूणराजा दिवसात अधूनमधून उघडीप ऊन तर सायंकाली जोरदार बरसत असल्याने सर्वत्र हिरेमूड होत आहे...

बुधवारी गणपती बाप्पांचे आगमनानंतर शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात १९.२१ च्या सरासरीने ३०७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुकावार पाऊस (मिमी) : अलिबाग ५, मुरूड ५, पेण १०, पनवेल ११.८, उरण ३०, कर्जत २०, खालापूर ३४, माथेरान २१.६, रोहा १७, सुधागड ३१, माणगाव ३४, तळा १५, महाड १६, पोलादपूर १९, श्रीवर्धन २५, म्हसळा १३.तर सोमवारी १ सप्तेंबर रोजी सकाळी आठ वाजता हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अलिबाग १६, मुरूड ५, पेण १७, पनवेल २०,उरण ५, कर्जत ३४, खालापूर १७, माथेरान ३५, रोहा ३१, सुधागड १६, माणगाव ३, तळा १२, महाड ११, पोलादपूर ९, श्रीवर्धन २०, म्हसळा १३, असा एकूण २६५ मी.मी.तर सरासरी १६.५९ मी मी पाऊस पडला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post