मुरुड पत्रकार: मयूर पालवणकर
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अलिबागमध्ये आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस देण्याचे आश्वासन देऊनही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातील शंभरहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. क्रीडा अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.