मुरुड पत्रकार मयुर पालवणकर
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेले ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण अभियान अयशस्वी ठरले आहे. ग्रामपंचायतींना स्वच्छता राखण्याच्या सूचना देऊनही, गावांच्या वेशीवर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत आणि ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे, ज्यामुळे अभियानाचा मूळ उद्देश साध्य झाला नाही...