मुंबई प्रतिनीधी: (सतिश वि.पाटील): १६ एशियन शुटींग स्पर्धेत ब्राझ व सिल्व्हर मेडल पटकावले. आवनी कोळी उरण दिघोडे गावची सुकन्या आहे.भारतीय नेमबाज स्पर्धेत संघातून तीने ही कौतुकास्पद कामगिरी केली.नेमबाजी हा क्रिडा प्रकार असून या मध्ये पिस्तूल, रायफल,बंदूक,एयरगनचा या सारख्या शस्त्राचा वापर करून अचूक अशी वेग,नेमबाजी तपासली जातात रायफल पंन्नास मिटर,शाॅटगन, स्ट्रीप हे नेमबाजी चे प्रकार यामध्ये अचूक कौशल्य तपासली जातात.यामध्ये अचूक नेम धरून गोळी मारली जाते.आवनी कोळी असामान्य घरातील खेडेगावातील जन्म मुलगी साधारण शिक्षण आणि नंतर लग्न पुढे संसार हीच पद्धत असते.पण तीच्या आईवडीलांनी धुणी,भांडी न देता बंदूक दिली. आवनीचे वडील हे उत्तम कोच, राष्ट्रीय नेमबाज आहेत, गावचे उपसरपंच विद्यमान सदस्य आहेत.म्हणून त्यांनी आपल्या कन्येला या क्षेत्रात प्रोत्साहन देऊन आज ती त्याचे स्वप्न पुर्णकरीतआहे.बंदूक ,शाॅटगन ही मक्तेदारी पुरषाची राजे महाराजा आणि श्रीमंताची शौक लांखोचे खेळ मानले जातात. हे उपलब्ध नसताना साधारण किटने आवनीने सराव करून अनेक मेडल्स मिळवणारी भारतीय महीला आहे.याच पावलावर पाऊल ठेवून आवनीचा भाऊ देखील नेमबाजी क्षेत्रात उतरून स्पर्धेत भाग घेऊन कामगिरी बजावत आहे.इंडीयन माॅडेल स्कुल ज्युनियर कॉलेज (उलवे) येथे झाले.पुढील एफवायबीएसी चे शिक्षण उरण येथे घेत आहे. या क्षेत्रात प्रोत्साहित झाली. वयाच्या बारा वर्षांपासून अनेक मेडल्स नावावर शिक्कामोर्तब केली आहेत.या कामगिरीत कोच व अनेकांनी तिला मार्गदर्शन केले. कौतुकास्पद कामगिरी बद्दल संपुर्ण उरण तालुक्यातील तिचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.