महाराष्ट्र वेदभुमी

शिक्षणप्रेमी नेतृत्वाची थेट वर्णी; निसार फिरफिरे अंजुमन इस्लाम जंजिरा कार्यकारिणीत, रायगडातून अभिनंदनाचा वर्षाव



रायगड :- (नरेश पाटील)  ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनासाठी दीर्घकालीन कार्य करत असलेल्या निसार फिरफिरे यांची अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीत सदस्य म्हणून निवड झाली आहे. ही निवड त्यांच्या दोन दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेला मिळालेली मान्यता असून, शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाला मिळालेलं एक नवं व्यासपीठ आहे...

    ‘रॉयल एज्युकेशन अँड वेल्फेअर ऑर्गनायझेशन’चे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना, फिरफिरे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षक सक्षमीकरण, आणि शाळांची शैक्षणिक अधोरेखित बांधणी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांची संवादशैली प्रभावी, दृष्टिकोन परिवर्तनशील आणि सामाजिक जाणिवा ठाम आहेत...

२७ जून रोजी पार पडलेल्या कार्यकारिणी निवड प्रक्रियेत, अध्यक्षपदी नाजीम चोगले, सचिवपदी निसार बिरवाडकर यांची निवड झाली असून, म्हसळा विभागासाठी निसार फिरफिरे यांची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली. शैक्षणिक विकासाच्या नव्या दिशा ठरवण्यात आणि संस्थेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करण्यात फिरफिरे यांचे योगदान मोलाचे ठरेल, अशी भावना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post