प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- रामटेक हे धान उत्पादक तहसील आहे. खरीप हंगामात तहसीलात सर्वसाधारण लागवड ७० हजार हेक्टर असून भाताचे पीक घेतले जाते. सद्यस्थितीत तहसीलित धानाच्या रोवणीने जोर पकडला आहे. अशातच उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, रमेश कोळपे यांनी पदाचा कुठलाही अभिमान न बाळगता तालुक्यातील पिंडकपार गावाचा धानाच्या शेतात हजेरी लावून पायाने चिखल तुडवित पारंपरिक पद्धतीने धानाची रोवणी केली.
