रायगड: - आंतरराष्ट्रीय खेळाडू राकेश मनोज बेदी यांनी नुकतेच जॉर्जिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बटुमी ओपन वुशु चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.. आणि ७५ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकून देशाचा अभिमान उंचावला.., ज्यामुळे गाव, शहर, राज्य आणि संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..
राकेश मनोज बेदी रायगड (महाराष्ट्र) येथे पोहोचताच, माननीय जे.एम. म्हात्रे आणि दादा प्रीतम म्हात्रे यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडूला फोन करून त्याचा सन्मान केला... आणि त्याला सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन ही दिले!
आंतरराष्ट्रीय खेळाडू राकेश मनोज यांनी भारतातील एका खेळाडूला योग्य पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्याचे मनोबल उंचावल्याबद्दल माननीय जे.एम. म्हात्रे साहेब, दादा प्रीतम म्हात्रे जी यांचे विशेष आभार व्यक्त केले...