महाराष्ट्र वेदभुमी

"तिहेरी पाणी आडवण्याचा यशस्वी प्रयोग साध्य"

 


"पाण्याचा एकही थेंब वाहून(वाया) जाऊ देनार नाही"

मुंबई प्रतिनिधी : (सतिश वि.पाटील)

प्रत्येक थेंब आडवून  जमिनीत मुरवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मोठ्या जिद्दीने धैर्याने अपेक्षेने धडपडत राहणार ,, 

ज्या ओसाड माळरानावर मी गेल्या चार  वर्षांपासून रात्रनदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करूनं आणि नैसर्गिकरित्या पाणी भरून घेण्यासाठी मी माझ्या श्रमदानातून  भांडी  तयार करत होतो, त्या ठीकाणी  आज संध्याकाळच्या वेळीं आणि दमदार संततधार पाऊसाने हाजेरी लावली,सर्वत्र पाणी च पाणी झाले,

 झाडाच्या बुंध्याला लगत त्रिकोणी आकाराचे खड्डे आळी खांदून घेऊनः त्यामध्ये उंचवट्यावरून उताराच्या दिशेने वाहून येणारे पाऊसाचे पाणी पाण्याबरोबर वाहत येणारी माती  तयार केलेल्या भांड्यात येऊन  झाडाच्या बुध्यालगत स्थिर झाली ,, ते पाणी  धरणीमाईच्या उदरात मुरवले...एकही थेंब वाया जाऊ दिला नाही... यामुळे  मला खूप समाधान व आनंद होत आहे  तहान शमली,

या आनोख्या प्रयोगातून मी तिहेरी यशस्वीरित्या फायदा करून घेतला...  1 ) वाहून वाया जाणारे पाणी अडवून मुरवले, 2) पाण्याबरोबर नैसर्गिक खतयुक्त वाहून जाणारी माती शास्त्रशुद्धपद्धतीने आडवली,3) आणि लावलेल्या झाडाला नैसर्गिकरित्या जास्तीजास्त प्रमाणात पाणी पोशक द्रव्य खतयुक्त सुपीक कसदार माती उपलब्ध झाली झाड नैसर्गिक पध्दतीने वाढू लागले,

!! पाणी माती आडवली,झाड लावले, झाड जगवले !!

आज माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, मी केलेल्या कष्टाचे चीज झाले... हा तीहेरी प्रयोग महाराष्ट्रातील सर्व कष्टकरी श्रमकरी निसर्गप्रेमींनी  करणे गरजेचे आहे... पर्यावरण संवर्धन निसर्ग संवर्धन करण्यासाठी अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे आहे....

टिप:अनेकजणांनी यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने जरी एकच झाड लावून जगवले तरी काही वर्षांत एकशे चाळीस कोटी झाडे रूजतील फक्त आवड ,मेहनत, जिद्द जरूरी आहे शाळेतून व प्रत्येकाच्या घरातून ही प्रोत्साहन दिले पाहिजे काळाची गरज आहे विकासाच्या नावाने होणारी वृक्षतोड नैसर्गिक समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे... पालकांनी मुलांना नको मोबाईल वेड,नाचगाणे,युट्यूबर, बालकलाकार बनवण्यापेक्षा निसर्ग संवर्धन कसे करता येईल यासाठी पुढाकार घ्यायला हवा... यामुळे सर्वाचाच फायदा होईल... सरकारकडून ही या योजनेला आर्थिक मदत केली पाहीजे जनहितार्थ... सातारा रोहित रक्षिता        जलयोद्धा निसर्गप्रेमी 9503070900                  7620042739

Post a Comment

Previous Post Next Post