विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड
कांतीलाल पाटील : नवी मुंबई प्रतिनिधी
उलवे- दि.२५ : रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रायगड डिस्ट्रिक्ट एथलेटिक्स असोसिएशन च्या मार्फत रायगड डिस्ट्रिक्ट ज्युनियर एथलेटिक्स चैम्पियनशिप २०२५-२६ मध्ये सहभाग घेतला... सदर स्पर्धा दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट २०२५ रोजी जिओ इंस्टिट्यूट उलवे येथे पार पडल्या...
या स्पर्धांमध्ये कु. प्रेम संतोष ठाकूर (२३ वर्षाखालील मुले) ५००० मीटर धावणे प्रथम क्रमांक मिळविला, गुलशन भोलाराम बंजारे (२० वर्षाखालील मुले) ५००० मीटर धावणे प्रथम क्रमांक त्याचप्रमाणे वयोगट २० वर्षाखालील मुली - नेत्रा गावंड ८०० मीटर धावणे व १५०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक, मिळविला.तर पायल घरत १००० मीटर धावणे तिसरा क्रमांक व हेप्टाथलॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक, कृतिका म्हात्रे ४०० धावणे द्वितीय क्रमांक मिळविला. त्याच बरोबर ह्या सर्व विद्यार्थी स्पर्धकांची राज्य स्तरीय निवड बालेवाडी पुणे येथे करण्यात आली आहे...
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष श्री. बाळाराम पाटील, श्री. सुधीर घरत, सौ. भावना घाणेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले... त्यांना जिमखाना प्रमुख श्री. देवेंद्र कांबळे व सर्व जिमखाना सदस्यांचे मागर्दर्शन लाभले.