जबरी चोरीसह खुन करणाऱ्या आरोपी कल्पेश जाधव ला माणगाांव पोलिसांनी ठोकल्या बेड्या...
शहानवाज मुकादम/रोहा
माणगाांव: पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीसह वयोवृध्द महिलेचा खुन करणाऱ्या आरोपीस माणगाांव पोलिसांनी केली अटक..
माणगाांव पेालीस ठाणे गुन्हा रजि.नां.98/2025 भा.न्या.संहिता 2023 चे कलम 103(1),311,333
अन्वये दाखल गुन्हयात अज्ञात आरोपीत यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश करून फिर्यादी यांची पत्नी हिस जबर मारहाण करून तिचे कानातील, गळयातील, हातातील सोन्याचे दागीने तसेच दोन मोबाईल फोन इतका मुद्देमाल चोरून तिला जबर दुखापत करून जिवे ठार मारले म्हणुन अज्ञात आरोपी विरूध्द दि.10/05/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता...
नमुद गुन्हयातील वयोवृध्द महिला नामे सौ.संगीता मनोहर मोकाशाी वय-70 वर्षे, रा.येरद, ता.माणगाांव, जि.रायगड यांना जिवे ठारे करणा-या व कानातील, व गळयातील सोन्याचे दागीने, मोबाईल फोन चोरून घेवुन जाणाऱ्या आरोपीचा शोध घेणेकामी अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाच्या घटणास्थळी वारंवार भेटी देवुन, आजूबाजूच्या परीसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली...
पोलीस ठाणे हद्दीतील गुप्तबातमीदारा मार्फत गुन्हयातील अज्ञात आरोपीबाबत माहीती घेतली. घटणास्थळाचे तांत्रिक विश्लेषण अथक परीश्रमाने वरील नमुद महिला यांना जिवे ठार करणाऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आले...
गुन्हयातील आरोपीत नामे कल्पेश बबन जाधव वय-25 वर्षे, व्यवसाय-मोलमजुरी, रा.येरद आदीवासीवाडी, ता.माणगाांव, जि.रायगड हा रेशन आणण्यासाठी येरद आदीवासीवाडी येथुन येरद गावामध्ये पायी चालत गेला होता. तेथे गेल्यावर रेशन दुकान बांद होते. त्यास तहान लागल्याने रेशनिंग दूकानाच्या समोर असलेल्या घराच्या कांम्पाउांडच्या गेटमधून आतमध्ये जावून दरवाजा वाजविला...
तेव्हा सदरचा दरवाजा एक वृध्द महिलेने उघडला तेव्हा पाहीले तर ती घरामध्ये एकटीच असल्याचे पाहीले...
तेव्हा तिच्याकडे पाणी प्यायला मागीतले व ती महिला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जात असताना नमुद आरोपीत यांनी तिचे पाठीमागुन येवुन तिचे गळयातील सोन्याचे पोत ओढले तेव्हा,सदर महिला खाली पडली असता ती ओरडेल म्हणुन तिचा गळा व तोंड दाबला तीची हालचाल बांद झाल्यावर तिच्या हातातील बेनटेक्सच्या चार बांगड्या, कर्णफुले काढुन घेतली, व टेबलवरील मोबाईल फोन घेवुन घराचा दरवाजा ओढुन तेथुन आदीवासीवाडी बाजूकडे धावत गेला...
सदर गुन्हयातील आरोपीत नामे कल्पेश बबन जाधव वय-25 वर्षे, व्यवसाय मोलमजुरी, रा.येरद आदीवासीवाडी, ता.माणगाांव, जि.रायगड याचा शिताफीने शोध घेवुन त्यास दिनांक 29/08/2025 रोजी अटक करण्यात आली असुन आरोपीत यांस दि. 30/08/2025 रोजी पर्यंत मा.न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे... आरोपीत याचेकडुन चोरी केलेला मुद्देमाल जप्त करत आसलेची ही माहिती पोलीस हवालदार भोनकर यांनी दिली आहे...
सदरची कामगीरी श्रीमती ऑंचल दलाल मॅडम, पोलीस अधीक्षक रायगड,श्री.अभिजीत शिवथरे, मा.अपर पोलीस अधीक्षक रायगड, शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड विभाग, सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाांव विभागयाांचे मागादर्षानाखाली निवृत्ती बो-हाडे पोलीस निरीक्षक, सहपोलीस निरीक्षक/भैरु जाधव, पोह/ भोनकर, पोह/ फडताडे, पोह/घोडके, पोशि/ शिर्के, पोशि/ काांबळे, पोशि/पाटील, पोशि/ मुंडेसह सर्व माणगाांव पोलीस ठाणे यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे...