महाराष्ट्र वेदभुमी

आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस..तंटामुक्त ग्रामपंचायत समिती अध्यक्षपदी निवड...

रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर.. ग्रुप ग्रामपंचायत खैरेखुर्द रोहा तालुक्यातील चणे रे विभागातील नावाजलेल्या ग्रामपंचायत मध्ये  तारीख २६ऑगस्ट २०२५ च्या ग्रामसभेमध्ये श्री.अरुण यशवंत कोंडे तळवडे गावचे सुपुत्र यांची बिनविरोध तंटामुक्त ग्रामपंचायत समिती अध्यक्षपदी निवड झाली. ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही देत ग्रामपंचायत खैरेखुर्द या भागातील सर्व तंटे सामाजिक सलोख्याने मिटव णार आणि जनतेच हित जपणार असे छान व्यक्तिमत्व आपण निवडून दिले असे प्रतिपादन श्री अनिल सालवकर यांनी केले. गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आणि त्याचं प्रश्न मार्गी लावण्यासाठी जी संधी प्राप्त झाली त्याचे सोने करून त्यांना सर्वोतोपरी साहाय्य करणार आणि आपल्या पदाला योग्य न्याय देणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांची ख्याती असलेल्या श्री कोंडे यांच्या या निवडीला उपस्थित ग्रामस्थांपैकी श्री जुनेद ध नसे यांनी सूचक म्हणून आणि अनुमोदक श्री अनिल साळवकर यांनी दिले. अशा प्रकारे सदरची सभा खेळीमेळीच्या वातावरत पार पडली...

Post a Comment

Previous Post Next Post