मार्च २०२५ ला निघाला वर्क आर्डर , १६ महिण्यात काम पूर्ण करणे
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक : रामटेकच्या नवीन बसस्थानकाच्या बांधकामासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर १४ कोटी मंजूर झाले आहेत. वर्क आर्डर मार्च २०२५ ला मिळाले. १६ महिन्यात म्हणजे जून २०२६ ला पूर्ण करायचे आहे. मात्र बांधकाम काम कासवाच्या गतीने सुरू आहे. बांधकामासाठी जुने बसस्थानक उन्हाळात पाडण्यात आले. त्या ठिकाणी नवीन बसस्थानकाचे काम सुरू आहे. बस संचालन व प्रवाशी करिता तात्पुरता शेड तयार करण्यात आला असून त्या तात्पुरत्या शेडमधून बसेसचे संचालन केले जात आहे. यामुळे प्रवासी व बससेवेच्या संचालनात गैरसोयी निर्माण होत आहेत. नवीन बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण झाल्यासच प्रवाशांना सोयी मिळू शकतील.
उन्हाळात जुने बसस्थानक पाडण्याचे काम पूर्ण झाले होते. तेव्हापासून पायाभरणीचे काम करण्यास वेळ मिळाला. मात्र कामात गती आलेली नाही. सध्या पावसाळ्यात पायाभरणीतून कॉलम उभारण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. बांधकाम क्षेत्रात बेसमेंटसाठी मोठा खड्डा करण्यात आला आहे. त्या खड्ड्यात पाणी साचते. कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे...
काय म्हणतात अभियंता
बसस्थानकाच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या अभियंता प्रांजली यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, पायाभरणीच्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे कामात अडथळे येत आहेत. कामाला गती देण्यासाठी ठेकेदाराला सांगितले आहे.