कांतीलाल पाटील : कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
उरण,दि.०५ : पत्रकार क्षेत्रामध्ये नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे जनार्दन शंकर घरत.
ते पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे पनवेल सहसचिव होते. अखिल आगरी समाज परिषद चे सदस्य होते.मासिक आगरी दर्पण चे उपसंपादक होते. हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील ग्रंथालय व वाचनालय, पनवेल चे कार्यकारिणी सदस्य होते. ते उरण पंचायत समितीत गट विकास अधिकारी म्हणून सेवेत होते. अश्या विविध क्षेत्रात त्यांनी काम करत समाजाची सेवा केली. आणि समाजा पासून वंचित असलेल्या घटकांना न्याय मिळवून दिला...
०५ ऑगस्ट २०२५ रोजी जनार्दन शंकर घरत (काका) सात रहाटी उरण येथे राहत्या घरी ८२ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांनी केलेल्या समाज सेवेला आणि या देव माणसाच्या कार्याला माझा सलाम...
