महाराष्ट्र वेदभुमी

ओढ गणरायाच्या आगमनाची

लागली ओढ माझ्या वेड्या मना.. कधी पाही न.. कधी पूजी न माझ्या लाडक्या गणा...

प्रतिनिधी नंदेश गायकर... श्रावण महिना सर ल्यानंतर प्रत्येक वेड्या भक्ताला गणरायाच्या आगमनाची ओढ लागते. मुंबईचे चाकरमानी गावच्या परतिच्या वाटेला लागतात. सण वर्षाचा आनंदाचा गणरायाच्या आगमनाचा, आतुर्ले हे डोळे बाप्पाला पाहण्या. ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या धूमधडाक्यात बाप्पाच आगमन होत... 


स्वर्गातील देवसुद्धा ज्याच्या आगमनाच्या दिवशी वरून पुष्पवृष्टी करतात त्या 64कलांचा अधिपती गणपती घरोघरी पुजला जातो. धरती माता वसुंधरा बहरलेली असते. असाच रोहा तालुक्यातील मौजे टिटवी या गावाच्या राजाच जल्लोषात आगमन होताना प्रत्येक भक्त गण आनंदित प्रफुल्लित होता. मानाचा राजा असे ख्याती असलेल्या टिटवीच्या राजाची मिरवणूक चनेरे नाक्यावरून काढण्यात आली. त्याची विहंगम दृश्य पाहायला सारी चणे रे नगरी एकवटली होती...

Post a Comment

Previous Post Next Post