धार्मिक उत्सव शांततेत व गालबोट न लागता साजरे करा आणि पोलीसांना सहकार्य करा.
मुंबई प्रतिनीधी :(सतिश वि.पाटील)
गणेशोत्सव मंडळ व पोलीस संवाद कार्यक्रम महाकवी कालिदास नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता.मा.डाॅ.श्री.महेश पाटील - (अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मुंबई)मा.श्री.राकेश ओला-(पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ मुंबई ) संदीप मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त मुलुंड विभाग) अजय जोशी( वरीष्ठ पोलिस निरीक्षक मुलुंड ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मुलुंड विभाग, भांडूप विभाग,बृहन्मुंबई पालिका 'टी' विभाग.मुलुंड, 'एस' विभाग भांडूप, अग्निशमन दल मुलुंड सर्व उपनगरातील गणेशोत्सव मंडळ व पदाधिकारी , पत्रकार यांची उपस्थिती होती...
विषय : भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते , पत्रकार, समाज सुधारक लोकमान्य टिळकांनी सर्व जनतेला एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना १८९३ केली सर्व जाती धर्मातील लोक एकोप्यांनी नांदावे स्वातंत्र्य चळवळीचे धडे देतात यावे असे लक्ष केंद्रित करून गणेशोत्सवाचा पाया मांडला तो आज अविरत चालू आहे.
आताच्या धगधगीच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मंडप उभारणी पासून पोलीस,विद्युत मंडळ, अग्निशमन दल, पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस या सर्व व्यवस्थेतून जावे लागते. मा.महेश पाटील व मा.राकेश ओला,विद्युत मंडळ, पालिका प्रशासन, अग्निशमन दल यांनी सुचक व मार्गदर्शक माहीती दिली.कुठेही अनुचित प्रकार घडू नये याबाबत प्रोजेक्टर क्रीन वर कशी दक्षता घ्यावी काय उपाय करावे रितसर दाखवून दिले अत्यावश्यक सेवेचे नंबर देण्यात आले मागिल वर्षी समाज प्रबोधनात्मक देखाव्याचे पोलीसांकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.समस्यांबाबत खुली चर्चासत्र करण्यात आले .त्यावर उपाय ही सुचविण्यात आले विद्युत उपकरणे चांगल्या प्रतीचे वापरणे (ईएलसीबी, आरसीसीबी ) ३० मीली अँम्पीयर , विद्युत जोडणी परवानाधारक ठेकेदाराकडून व वायर आय एस आय मार्क ची असावी याची काळजी घ्यावी. तसेच उत्साह साजरा करताना कोणाला त्रास व भावना दुखावणार याची याचे भान असावे.अशी सुचना मुंबई पोलीस आयुक्त परिमंडळाकडून करण्यात आली...
आपात्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक:
पोलीस हेल्पलाईन कक्ष : १००\११२
महीलांसाठी व बालकांसाठी क्रमांक:१०९०\१०३
अँम्बुलेन्स: १०८
पोलीस मुख्य नियंत्रण कक्ष:०२२२२६३३३३३
सायबर गुन्हे बाबत हेल्पलाईन १९३०
बृहन्मुंबई आपात्कालीन कक्ष:१९१६
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कक्ष: १८००२१२३४३५, १८००२३३३४३६, १९१२, १९१२०