कन्हान प्रतिनिधी: पिपरी वस्थीमध्ये बेवारस कुत्र्यांचा जीवघेणा कहर वारंवार सुरू आहे.. तक्रार करूनही नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे... यामुळे सुरेश गोंडाणे यांना व अनेक नागरीकाना ह्या बेवारस कुत्र्यानी चावा घेतलाय, तसेच अनेक नागरिक औषधउपचार घेत असून काही नागरिकांची प्रकुर्ती चिंताजनक आहे... तसेच त्यांना नागपुर मेयो रुग्णालयात व इतर रुग्णालयात हलविण्यात आले असून ह्यावर मा.श्री.श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा यांना भेटून व चर्चा करुण निवेदन देण्यात आले.. तसेच बेवारस कुत्रे यांचावर प्रतिबंधक कारवाही करावी असे निवेदन देऊन सांगीतले... तसेच याबाबत नगरपरीषद प्रशासनावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी शिवाय भटक्या कुत्र्यांवर आला बसवा यासाठी विनंती करण्यात आली....