कन्हान प्रतिनिधी : पिपरी- कन्हान परिसरातील वार्ड 6 सूदर्शन चौक पिपरी कन्हान येथे आकाश माहतो मित्रपरिवार तर्फे तान्हापोला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मुलांचे नंदीपूजन करून करण्यात आली आयोजकांन तर्फे लावणी कार्यक्रम तसेच "भारतीय संस्कृतीची " थीमवर पुरस्कार वितरीत करण्यात आले. ज्यामध्ये वेशभुषा पुरस्कारात प्रथम,द्वितीय, तृतीय, चतुर्थ, तर नंदी सजावट मध्ये प्रथम,द्वितीय, तृतीय, चतुर्थ चिमुकल्यांचे निवड करण्यात आले. व त्यांना पारितोषिक देण्यात आले व इतर मुला मुलीला आकाश माहतो मित्रपरिवार तर्फे प्रोत्साहन पुरस्कार तसेच गिफ्ट वितरण देण्यात आले...
कार्यक्रमाच्या सफलार्थ सामाजिक सुरज माहतो,प्रशांत मासर, कुणाल खडसे,गौरव माहतो,हर्ष माहतो,सुशांत बर्वे,रुषभ हावरे,अभिषेक नारनवरे,अशोक मेश्राम,लकी बैस, विक्की उके रवी मेश्राम सह आकाश माहतो मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी संपूर्ण पिपरी येथील नागरिकांचे प्रमुख उपस्थिती होती...