"एक हात मदतीचा, अन चेहऱ्यावर फुलले हास्य...
कुपोषण दूर सारण्यासाठी रोटी फॉउंडेशन पाऊल
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक :-मुंबई येथील ' रोटी फाऊंडेशन ' ही सेवाभावि संस्था ठरलेली आहे. ही संस्था नेहमीच शहरातील प्रख्यात समर्थ शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत फाऊंडेशनी शाळेतील विद्यार्थ्यांना सोया मिल्क, फ्रुटी, मटरी तथा बरेच खाद्य पदार्थ भेट म्हणून दिले. गरीब गरजूंना पौष्टिक जेवण, न्यूट्रिशन, मल्टीविटामिन, देऊन विविध उपक्रमांद्वारे भारत देशामधून कुपोषण दूर करणे. प्रत्यक्षात ते करण्यासाठी "रोटी फाउंडेशन मुंबईने "पाऊल उचलले आहे. रोटी फाउंडेशनचे संस्थापक एम.आर.डी. शिवनंदन (माजी डीजीपी महाराष्ट्र) यांनी आपल्या निस्वार्थी आणि विचारशील चारित्र्याचे उदाहरण देत निस्वार्थ सेवेचे हे पाऊल उचलले आहे. गरजू विद्यार्थ्यांना निरोगी ठेवणे , आरोग्यदायी जीवन देणे यावर लक्ष केंद्रित करणे असा उद्देश आहे. या धोरणतंर्गत समर्थ शाळेच्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनने चिक्की, लाडू, सोनपापडी, फ्रूटीज, बिस्किटे , सोया मिल्क, मटरी असे पौष्टिक खाद्य पदार्थ वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्ती वाढविण्यासाठी त्यांनी शाळेला नुकतीच क्रिकेट किट, बॅडमिंटनची किट व फुटबॉल सुद्धा दिलेले आहेत. फाउंडेशन आरोग्य आणि महिला सुरक्षा यांसारख्या क्षेत्रातही काम करतात. त्यांनी फाउंडेशनला दिलेले ' रोटी '(आरओटीआय) म्हणजे रिटर्न ऑफ टाईमली इन्व्हेस्टमेंट, हे नाव धोरणात्मक गुंतवणूक नियोजनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवण्याच्या कार्याला, त्यांच्या समर्पणाला मूर्त रूप देते...
शाळेने मानले आभार
रोटी फाउंडेशनने शाळेतील मुलांना पुरवलेल्या गोष्टींसह मुलांचा चांगला वेळ जात आहे. त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांची सकारात्मक वृत्ती आणि कठोर परिश्रम, शाळेत उत्साही व आनंदी वातावरण तयार करण्यास मदत करीत आहेत. "त्यांच्या सहभागाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आम्हाला यशस्वी करण्यात मदत केल्याबद्दल रोटी फाउंडेशन मुंबईचे त्यांनी आभार मानले आहे.
