महाराष्ट्र वेदभुमी

रोह्यात इको सेन्सेटिव्ह झोन हरकत प्रकरणी ग्रामस्थाचे खासदारांना निवेदन,

झोन उठविण्यासाठी प्रयत्न करणार : खा. सुनील तटकरे...

कोलाड (श्याम लोखंडे): रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यातील 734 गावांना केंद्र सरकारकडून वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे... इको सेन्सेटिव्ह झोन पडत असल्याची नोटीस त्या त्या तहसील कार्यालकडून सदरील तलाठी सज्याच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत... तर दिलेल्या मसुदा नोटीसबाबत साठ दिवसाच्या आत ग्रामस्थांकडून हरकती मागविल्या आहेत... या अनुषंगाने रोहा तालुक्यातील तलाठी सजा चिल्हे हद्दीतील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवळी ग्रामस्थानी एकत्र येत याबाबत हरकत घेत रायगडचे कर्तव्यदक्ष्य तसेच लोकप्रिय खा. सुनील तटकरेंना रविवारी सुतारवाडी येथे भेटून या हरकतीचे निवेदन दिले... यावेळी खा. तटकरे यांनी याबाबत मी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे मत उपस्थित ग्रामस्थांसमवेत व्यक्त केले... 

यावेळी तळवलीतर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र मरवडे, माजी सरपंच वसंतराव मरवडे, देवकान्हे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर, धोंडू कचरे, किशोर भोईर, शेतकरी संघटना सचिव जगदीश जाधव, राम महाडिक, राम लोखंडे, रमेश महाडिक, सुरेश महाडिक, संतोष भोईर, देविदास भोईर, श्याम लोखंडे, रविंद्र कान्हेकर, शशिकांत भोईर, विनायक माहित, वसंत शेडगे, विश्वास राऊत, नितीन बामणे आदीसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

रोहा तालुक्यातील जवळपास 119 गावांना इको सेन्सेटिव्ह झोन घोषित करण्यात येत असल्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत... त्यापैकी चिल्हे तलाठी सजा अंतर्गत देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली ही अशी गावे आहेत कि, त्या गावापासून पर्यावरणाला हानी पोहचविण्यासारखी परिस्थिती नाही... असे असताना देखील केंद्र शासनाने या गावांची नावे घेतल्याने ग्रामस्थानी खा सुनील तटकरेंची भेट सांगितले... तर यावर राज्य सरकारने तसेच दस्तुरखुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील आवाज उठवत असून मी देखील शेवटपर्यंत तुमच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा. तटकरे म्हणाले...

शासनाचे पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशील घोषित क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र.s.O.३०६०(E) dated ३१ जुलै २०२४ अन्वये रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ४३७ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे... यात रोहा तालुक्यातील 119 गावांचा समावेश आहे... यामध्ये रोहा तालुक्यातील  तळाठी सजा चिल्हे मधील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली आदी गावांचा समावेश आहे... तसेच केंद्रशासनाच्या या जाचक निर्णयाविरुद्ध रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांना रविवारी निवेदन दिले तसेच विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांची देखील भेट घेत उपस्थित ग्रामस्थानी या बाबत माहिती दिली तसेच रोहा तालुक्यातील ग्रामस्थ सोमवारी रोहा प्रतधिकारी, वनविभाग व तहसीलदार यांनाही निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थानी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post