व्हाट्सएपच्या ग्रुपचा स्तुत्य उपक्रम,
सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या श्री. क्षेत्र कनकेश्वर येथील डोंगरावर श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दि. २७ जुलै रोजी सोशल मीडिया व्हाट्सएपच्या 'अलिबागकर एक हात मदतीचा' या ग्रुपने मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली...
यावेळी कनकेश्वर डोंगराच्या पायथ्यापासून ते मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या व आजूबाजूच्या परिसर तसेच मंदिर, गायमुख व परिसरातील सर्वच ठिकाणी असलेला प्लास्टिक, काचेच्या बाटल्या व इतर प्रकारचा कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली... या स्वच्छता मोहिमेत ग्रुपमधील अमरेश ठाकूर, कौस्तुभ पाटील, मनोज माळी, शैलेश दळवी, रोशन वर्तक, मंदार पवार, नेत्रम मोकल व इतर अनेक सदस्य उपस्थित होते...
फोटो लाईन : कनकेश्वर येथे स्वच्छता मोहीम राबविताना व्हाट्सएपच्या 'अलिबागकर एक हात मदतीचा' या ग्रुपचे सदस्य,
