महाराष्ट्र वेदभुमी

पनवेल एस.टी. डेपोचा महत्त्वपूर्ण रखडलेला प्रकल्प पहिले मार्गी लावा - पत्रकार कांतीलाल पाटील

उरण पनवेलच्या आमदारांनी जनतेच्या प्रश्नाकडे पहिले लक्ष दयावे...

कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी

पनवेल - दि.२८ :  पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो... कोकण, तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या पनवेलचे भौगोलिक महत्त्व हे फार मोठे आहे व अनेक वर्षांपासून पनवेल बस डेपो येथून हजारो एसटी बसेसची वाहतूक होत असते... आजही पनवेल बस डेपो मधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात... अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे...

B.O.T. तत्त्वावरती या बस डेपोच्या विकासाचे काम हे एका कंत्राटदाराला दिले आहे... परंतु सुरुवातीपासूनच या कंत्राटदाराने कामामध्ये दिरंगाई केली आहे... आता काही तांत्रिक अडचणीमुळेही हा प्रकल्प धिम्या गतीने सुरू आहे...

या विषयाची एक विस्तृत बैठक सुद्धा परिवहन मंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती... परंतु अजूनही या विषयात काही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही...

पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी पत्रकार कांतीलाल पाटील यांनी केलेली आहे...

B.O.T. तत्वावर जर हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य होत नसेल व त्यामध्ये प्रकल्पाच्या उंचीचे कारण दाखवत पर्यावरण खात्याकडून काही अडचणी असतील, तर या प्रकल्पाचे स्वरूप तात्काळ बदलावे व B.O.T. ऐवजी शासनाकडून या प्रकल्पाला पुढे नेण्याकरिता प्रयत्न करावे, जेणेकरून प्रकल्पाच्या उंचीचा प्रश्न हा निकाली निघू शकेल व प्रकल्प पूर्ण होऊ शकेल...

Post a Comment

Previous Post Next Post