महाराष्ट्र वेदभुमी

'ऑपरेशन महादेव' अंतर्गत कारवाई;पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड मूसा यासह तिघा दहशतवाद्यांचा खात्मा..!

मुंबई प्रतिनिधी -:जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरजवळील लिडवास परिसरात भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव अंतर्गत मोठी कारवाई केलीय... सुरक्षा दलांनी केलेल्या या धडक कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले.. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधातील मोठा बदला मानला जात आहे...या कारवाईमुळे खोऱ्यातील दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसलाय...

 लष्कराच्या या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी मूसा याचाही खात्मा करण्यात आल्याचे समजते.  सोमवारी संसदेत एकीकडे ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार असताना त्या पार्श्वभुमीवर पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा केल्याची बातमी समोर आली... 

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने 28 जुलै रोजी पहाटे लिडवास आणि दाचीगामच्या घनदाट जंगलात वेढा घातला... जवानांनी परिसराला वेढा घातल्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला... अनेक तास चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत तीन दहशतवाद्यांना ठार केले...

 सुरक्षा दलांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटशी संबंधित होते... हे दहशतवादी नुकत्याच झालेल्या पहिलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचा प्रबळ संशय आहे... त्यामुळे 'ऑपरेशन महादेव' ही केवळ एक दहशतवादविरोधी कारवाई नसून पहिलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post