🔹 पार्श्वभूमी:
दि. 28 जुलै 2025 रोजी https://maharashtravedbhoomi.blogspot.com/2025/07/blog-post_877.html या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तात रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुनिल तटकरे यांनी माणगाव बायपासचे काम सुरू व्हायला अजून २ वर्ष लागतील असे उद्गार एका बैठकीत व्यक्त केले...
या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली. यासंदर्भात जनआक्रोश समितीने मुख्य अभियंता मा. श्री.संतोष शेलार साहेब यांची मा.श्री.संजय यादवराव साहेब यांच्या उपस्थितीत भेट घेऊन खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली...
🔸 चर्चेतील मुख्य मुद्दे:
1️⃣ माणगाव-इंदापूर बायपास रद्द?
अफवांची शंका निर्माण झाली होती की माणगाव बायपास रद्द झाला आहे..
यावर संतोष शेलार साहेबांनी स्पष्ट सांगितले की बायपास रद्द झालेला नाही, तो होणार आहे...
2️⃣ रेल्वेची अडचण?
काही वृत्तांत असे सूचित केले होते की रेल्वे परवानगी देत नाही...यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की रेल्वे परवानगी संदर्भात कुठलीही अडचण नाही, ही एक अफवा आहे...
3️⃣ कामाला सुरुवात अजून २ वर्षांनी?
खासदार तटकरे यांच्या वक्तव्याविरोधात शेलार साहेबांनी स्पष्ट केले की:
LOI आधारे सध्या काम सुरू आहे...
काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे...
4️⃣ फसणाऱ्या डेडलाईनबाबत मागणी:
वारंवार देण्यात येणाऱ्या डेडलाईनमुळे जनतेचा विश्वास उडत चालला आहे...
यावर उपाय म्हणून बार चार्ट (कार्य प्रगतीचे वेळापत्रक) तयार करून जनतेसमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली...
5️⃣ DPR (Daily Progress Report) व मासिक आढावा:
दररोज कामाचा प्रगती अहवाल (DPR) नियमितपणे तयार करण्यात यावा अशी मागणी...
प्रत्येक १५ ते ३० दिवसांनी मासिक आढावा बैठक आयोजित व्हावी ज्यामध्ये:संबंधित ठेकेदार महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जनआक्रोश समितीचे प्रतिनिधी यांचा सहभाग असावा, अशी ठाम मागणी करण्यात आली,यासाठी अनुमती दर्शविण्यात आली...
6️⃣ खड्ड्यांची पाहणी व त्वरित भराव:
मा.शेलार साहेबांनी आश्वासन दिले की गणपतीपूर्वी महामार्गावरील सर्व खड्डे भरले जातील...
यासाठी पाणी दौरा करणार असून, ठेकेदार व अभियंते प्रत्यक्ष पाहणी करतील...
7️⃣ वाहतूक व्यवस्थापन:
माणगाव व इंदापूर येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची टीम लवकरच नियुक्त करण्यात येणार आहे...
📌 निष्कर्ष:
या बैठकीमधून स्पष्ट झाले की माणगाव-इंदापूर बायपास रखडलेला असला तरी काम रद्द झालेला नाही...
महत्वाचे म्हणजे आता केवळ तारीख नव्हे तर योजना, वेळापत्रक व जनतेचा सहभाग यावर भर देण्याची गरज अधिकाऱ्यांनी मान्य केली...
