महाराष्ट्र वेदभुमी

खा सुरेश म्हात्रे यांनी संसद भवनात दि.बा.पाटील विमानतळ नामकरण मुद्दा उपस्थित केला.

 

मुंबई प्रतिनीधी: (सतिश वि.पाटील)

सत्ताधारी सरकार फक्त नवी मुंबई विमानतळासाठी हजारो कोटींचे ठेके आपल्याच लोकांना वाटण्यात व्यस्त आहेत व आमचे स्थानिक नेते ते घेण्यात व्यस्त आहेत. पण या भूमीसाठी लढणाऱ्या लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील साहेब यांचे नाव या विमानतळाला द्यावं, अशी मागणी झाल्यावर आतापर्यंत या सरकारने केवळ गुलाबी आश्वासने देत वेळकाढूपणा केला किंबहुना त्यांना विसर पडला आहे.मात्र, आमच्या भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज संसदेत ठामपणे आवाज उठवत, लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी करून सरकारला पुन्हा एकदा आपल्या आश्वासनाची आठवण करून दिली... सरकारच्या मौनाला धक्का देत त्यांनी आम्हां आगरी-कोळी व तमात भूमीपुत्र बांधवांचा आवाज सरकारपुढे पोहोचवला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post