महाराष्ट्र वेदभुमी

जम्मू-काश्मीरमधील गंदरबल येथे ITBP जवानांना घेऊन जाणारी बस सिंधू नदीत कोसळली,

जम्मू-काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील कुल्लन भागात एक मोठा अपघात झाला. मुसळधार पावसात ITBP जवानांना घेऊन जाणारी बस सिंधू नदीत कोसळली. त्यात अनेक जवान प्रवास करत होते...

सैनिकांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येतय... मात्र, त्यांची शस्त्रे वाहून गेलीत...

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला... बुधवारी सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस सिंधू नदीत कोसळली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) कर्मचारी होते...

मुसळधार पावसामुळे कुल्लन परिसरात सिंध नदीला पूर आलाय... बसमधील सर्व कामगारांचा शोध सुरू आहे... सध्या बसमध्ये किती लोक होते हे स्पष्ट झालेले नाही...

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली... एसडीआरएफ गंदरबल आणि एसडीआरएफ सब कंपोनेंट गुंड यांच्या संयुक्त पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली... 

मुसळधार पावसामुळे त्रास वाढला तथापि, आयटीबीपी जवानांची शस्त्रे नदीत वाहून गेली... ती बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. काही शस्त्रे नदीतून बाहेर काढण्यात आली.. परंतु अनेक वाहून गेली आहेत. जिथे बस अपघात झाला,तिथे मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post